आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमक असेल तर आयुक्तांकडे राजीनामा द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीला विरोध करणार्‍यांना भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकार्‍यांनी बुधवारी चोख प्रत्युत्तर दिले. मोहिनी पत्की आणि रोहिणी तडवळकर यांनी धमक असेल तर फक्त पक्षविरोधी भूमिका न घेता पालिका सदस्यत्वाचा आयुक्तांकडे राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजप पदाधिकार्‍यांनी दिले. तुमच्यावर पक्षाने जशी कारवाई केली तशी कारवाई या नऊ सदस्यांवर पक्ष करेल का, या प्रश्नावर उत्तर देताना नगरसेवक जगदीश पाटील यांनी ‘तेच पाहायचे आहे’, असे उत्तर दिले.

प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करूनच शहराध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी कृष्णाहरी दुस्सा यांची निवड जाहीर केली. निर्णयाच्या विरोधात जाऊन नूतन नगरसेवकांना भडकावून घरात बैठक घेणे योग्य नाही. ही निवड होण्यापूर्वी विजया वड्डेपल्ली, र्शीकांचना यन्नम आणि इंदिरा कुडक्याल यांच्या नावाचा आग्रह का केला नाही. पांडुरंग दिड्डी यांच्या प्रतोद निवडीला विरोध का केला. रोहिणी तडवळकर यांनी ‘फोटो सेशन’शिवाय वर्षभर काहीच केले नाही. काही विषयांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यावेळी पक्षनिष्ठा आठवली नाही का? नमिता थिटे यांच्यासारख्या कर्तबगार महिलेला पक्ष का सोडावा लागला? कॉँग्रेस आमदार आणि खासदार यांचा निधी घेताना पक्षनिष्ठा आठवली नाही का? धमक असेल तर या दोनही नगरसेविकांनी आयुक्तांकडे राजीनामा द्यावा, असा इशारा लक्ष्मीकांत गड्डम, जय साळुंके, व्यंकटेश कोंडी, राजकुमार पाटील, मल्लिकार्जुन सरगम, सागर अतनुरे, सुनील पाताळे आणि शंकर बंडगर यांनी दिला आहे.

नऊ नगरसेवकांची भूमिका पक्षविरोधी आहे. नाराजी असेल तर पक्षर्शेष्ठींकडे मांडावी. आरोप करणे चुकीचे आहे. त्यासाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षर्शेष्ठींकडे करणार आहे.’’ कृष्णाहरी दुस्सा, विरोधी पक्षनेते

पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी शहराध्यक्षावर पैसे घेतल्याचा आरोप करणार्‍यांना आता पक्षात घेऊ नये. तसेच पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांनी आयुक्तांकडे राजीनामा देऊन त्याच प्रभागातून निवडून येऊन दाखवावे.’’ सुरेश पाटील, नगरसेवक

कुठल्या पदावर कोण काय काम केले, हे सर्वांना माहीत आहे. कोणीही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. आम्ही त्यांची समजूत काढू. नाराज झालेले आहेत, त्यांची नाराजी दूर करू.’’ प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक