आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनात किंतु बाळगता सामोरे जा, विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला यशाचा कानमंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(युवकांना करिअर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी याविषयी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी रविवारी मार्गदर्शन केले. खचाखच भरलेला हुतात्मा स्मृती मंदिर ओसंडून वाहत होता. करिअर ध्येयवेडे युवक कानात जीव आणून ऐकत होते. छाया : रामदास काटकर)
सोलापूर- युवकांनी करिअरचे ध्येय, उद्देश ठरवून त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. उपलब्ध साधनांचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे. हे करीत असताना आपल्या अभ्यासक्रमाचा, इंग्रजी भाषेचा किंवा आपल्या शहराबद्दलचा किंतु बाळगता प्रत्येक कसोटीला आत्मविश्वासाने सामोरे जा. कोणताही न्यूनगंड बाळगू नये, तरच ध्येय गाठणे शक्य होईल, असा यशाचा कानमंत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी रविवारी येथे दिला.
करिअर ध्येयवेडे युवक कानात जीव आणून ऐकत होते. खचाखच भरलेला हुतात्मा स्मृती मंदिर ओसंडून वाहत होता. महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे भूमिपूजन सकाळी श्री. नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले. मार्कंडेय जलतरण तलाव परिसरात केंद्र बांधण्यात येत आहे. या कार्यक्रमानंतर श्री. नांगरे-पाटील यांचे व्याख्यान झाले.
ते पुढे की, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र उभारण्याचे जे उपक्रम अंमलात आणत आहेत, तो अतिशय गौरवास्पद आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा खडतर राजकीय प्रवास केला. तोसुद्धा युवकांना आदर्शवत असाच आहे.
मंचावर महापौर प्रा. सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, महापालिकेचे सभागृह नेते संजय हेमगड्डी, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, झारखंडचे जिल्हाधिकारी रमेश घोलप, परराष्ट्र खात्यातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरातील मध्यवर्ती भाग म्हणजे पोलिस मुख्यालयाच्या लगत एमपीएससी, यूपीएससी इतर स्पर्धा परीक्षांसाठी अद्ययावत असे अभ्यासकेंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध झाली. अभ्यासकेंद्र उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला. यासाठी आमदार शिंदे यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमास स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, महिला बाल कल्याण समिती सभापती अश्विनी जाधव, उद्यान मंडई सभापती फिरदोस पटेल, नगरसेवक बाबा मिस्त्री, अनिल पल्ली, पैगंबर शेख, देवेंद्र भंडारी, मधुकर आठवले, मेघनाथ येमूल, नगरसेविका जगदेवी नवले, संजीवनी कुलकर्णी, अनिता म्हेत्रे, काँग्रेस महिला अध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, गणेश डोंगरे यांचीही उपस्थिती होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तुम्हाला पाहण्यासाठी लोक उभे राहतील...महिलांनी प्रशासकीय सेवेत यावे...
बातम्या आणखी आहेत...