आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परिवहन’ला 40 कोटींची देणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन सेवा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालली पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असली तरी वाढलेल्या अवैद्य आणि खासगी वाहनांमुळे हा तोटा भरून निघत नाही.

व्हॉल्वो बस आल्याने त्याकडे प्रवाशांचा ओढा आहे. त्यामुळे अवैद्य वाहतूक करणारे या बसला टार्गेट करून त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. परिवहन विभागात चाललेल्या गोंधळामुळे ही सेवा तोट्यात चालत असून, या विभागास 40 कोटींची
देणी आहेत.

अशी आहेत देणी (1 एप्रिल 2014 अखेर)
महापालिका पतसंस्था : 41.32 लाख
मनपा चतुर्थ श्रेणी सोसायटी व्याजासह : 23.01 लाख
विमा : 27.86 लाख
व्यवसाय कर (ऑक्टोबर 13 अखेर) : 95.99 लाख
कायनेटिक फायनान्स (एप्रिल 1999 ते जुलै 02 पर्यत) : 95 हजार
मनपा घरबांधणी : 25 हजार
हुडको : 50 हजार
पाचव्या वेतन आयोग देय : 1 कोटी
शासकीय कर (वाहन, प्रवाशी कर व बालक पोषण निधी) : 8.30 कोटी
व्यापारी देणी : 1.12 कोटी
प्रा. फंड वर्गणी (एप्रिल 14 अखेर) :
7.46 कोटी
सेवानिवृत्त सेवकांच्या देय : 3.48 कोटी
अपघात नुकसान भरपाई : 29.78 लाख
विमा संचनालय मुंबई : 1.80 लाख
देना बँक : 2.93 कोटी
आयसीआयसीआय बँक : 1.76 कोटी
सेवकांचे सहावे वेतन प्रमाणे फरक (फेब्रुवारी 2002 पासून) : 11.40 कोटी
एकूण 39 कोटी 74 लाख 87 हजार 148
सहा मार्गांवर 841 खासगी प्रवासी वाहने
बोरामणी रस्ता : 90
अक्कलकोट रस्ता : 148
मंगळवेढा रस्ता : 178
मोहोळ रस्ता : 110
तुळजापूर रस्ता : 155
विजापूर रस्ता : 160