आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Construction 20 Vip Person List Ready Solapur

बेकायदा बांधकाम असलेल्या वीस व्हीआयपींची यादी तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बेकायदा बांधकाम, अतिक्रमण केलेल्या शहरातील सुमारे 20 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. कारवाईस पुढील आठवड्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमी व मालमत्ता विभागाच्या मदतीने ती तयार करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन अतिक्रमण, बेकायदा बांधकामविरोधी जोरदार मोहीम राबवत आहे. होटगी रस्ता, विजापूर रस्ता परिसरातील अतिक्रमण दूर करण्यात आले आहे. तक्रारींची शहानिशा करीत काहींचे अतिक्रमण पाडले. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनाही नोटीस देण्यात आली. महापालिकेने बांधकाम पाडण्यापूर्वी देशमुखांनी बांधकाम पाडले. र्शी. गुडेवार उद्या पुण्याला जात असून सोमवारी परतणार आहेत. यानंतर लगेच यादी तपासून मोहीम सुरू होईल.