आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरातील मंगलकार्यालयांच्या इमारतींची होणार तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील बेकायदा बांधकामांवर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तीन इमारतींची तपासणी आणि मोजणी करण्याचे आदेश नगर अभियंता कार्यालयास दिले. दोन दिवसांत या इमारतींची तपासणी होणार आहे. विजापूर रोडवरील सैफुल चौकात संजय शेळके यांनी सात मजली इमारत बांधली आहे. त्याबाबत तक्रार आली असून इमारत मुख्य रस्त्यापासून नियमानुसार आहे का? एफएसआय घेऊन बांधकाम झाले आहे का? आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. कस्तुरबा मार्केटसमोरील लिंगशेट्टी मंगलकार्यालय आणि बुधवार पेठेतील हिराचंद नेमचंद मंगल कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आहे. नगर रचना आधिकारी झेड. ए. नाईकवाडींसह प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांना तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

..तर सिंहगडची इमारत पाडावी लागेल
पुणे रोडवरील सिंहगड कॉलेजच्या इमारतींची चौकशी सुरू आहे. त्यापैकी एक इमारत डीपी रस्त्यावर असल्याचा सशंय आहे. डीपी रस्त्यावर इमारत असेल तर पाडण्यास काही अडचण येणार नाही आणि ती पाडावी लागेल, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पत्रकारांना सांगितले.