आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची पत्राशेडवर कारवाई बेकायदा फलकाला अभय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रंगभवन चौकातील शांती स्तंभाचा आधार घेत महापालिकेतील सत्ताधारी पक्षातील 17 नगरसेवकांची छबी असलेले सुमारे 25 बाय 25 चा डिजिटल फलक विनापरवाना उभा केले आहे. तेथील उद्यानात खड्डे मारून फलकाची बांधणी करण्यात आली आहे. भर चौकात उभारलेल्या या फलकाकडे दुर्लक्ष झाले आहे. विनापरवाना फलक उभारण्याची प्रथा शहरात निर्माण झाली आहे. यात आता नगरसेवकांची भर पडली आहे.

काँग्रेसच्या 17 नगरसेवकांची छबी असलेले फलक महापालिकेचा परवाना न घेताच उभारले गेले आहे. 1974 मध्य़े या चौकात शांतीस्तंभ उभारण्यात आला आहे. शांतीचा संदेश देणारे अशोक चक्र या स्तंभावर कोरले गेले आहे. पण, या स्तंभास लाकडी वासे बांधण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फलक लावण्यात आला आहे. यावर नगरसेवक उदय चाकोते, आरिफ शेख, देवेंद्र भंडारे, रफिक हत्तुरे, विवेक खरटमल, दत्तू बंदपट्टे, रियाज हुंडेकरी, बाबा मिस्त्री, अनिल पल्ली, राजकुमार हंचाटे, मेघनाथ येमूल, विनोद गायकवाड, संजीवनी कुलकर्णी, जगदेवी नवले, सुजाता आकेन, दमंयती भोसले, फिरदोस पटेल यांची छबी आहे.

परवानगीसाठी मनपाकडे अर्ज सादर
रंगभवन चौकात लावण्यात आलेल्या फलकाला परवाना अद्याप मिळाली नाही, पण त्यासाठी आम्ही अर्ज केला आहे.’’ अनिल पल्ली, नगरसेवक

निषेध करण्याची गरज
शांती देणार्‍या स्तंभाला असे वासे लावणे म्हणजे अशांती आहे. असा फलक लावत असेल तर त्यांचा मी निषेध करतो. डॉ. महावीर शास्त्री