आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदा गाळे खुले; शिवाजी रात्र प्रशालेस महापालिकेची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सरस्वती चौकातील छत्रपती शिवाजी रात्र प्रशालेच्या जागेत सहा गाळ्यांचे बेकायदा बांधकाम केले. शुक्रवारी शाळेची संरक्षक भिंत पाडत गाळे खुले करण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या नगरअभियंता कार्यालयाने नोटीस दिली आहे. ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनोहर सपाटे यांची आहे. गाळे बांधून झाल्यानंतर महापालिकेकडे र्शी. सपाटे यांनी बांधकाम परवाना मागितला आहे.

छत्रपती शिवाजी प्रशालेच्या आवारात सहा गाळे बांधण्यात आले असून, त्यापूर्वी पालिका बांधकाम विभागाकडून बांधकाम परवाना घेतला नाही. त्यामुळे संस्थेस पालिका प्रशासनाकडून यापूर्वी अनधिकृत बांधकाम, पाडकाम नोटीस, 24 तासांची नोटीस दिली. पण, कारवाई काहीच केली नाही. इतके दिवस गाळे संरक्षक भिंतीआड बंदिस्त अवस्थेत होते. महापालिका किंवा संस्थेने ते गाळे पाडले नाहीत.

उधार की रोशनी
शिवाजी प्रशालेची इमारत सुशोभीत करण्यात आली आहे. पण, महापालिकेच्या विजेवर इमारत प्रकाशात उजळून निघाली आहे. दुभाजकातील पथदिव्यांतून वीजजोडणी घेत चार प्रखर झोतांचे दिवे लावण्यात आले आहेत. प्रशालेची इमारत उजळली असून त्याचे वीजबिल मात्र महापालिकेला येणार आहे.

बांधकाम पाडणार
शिवाजी शाळेच्या आवारात बांधण्यात आलेले गाळे बेकायदेशीर आहेत. यापूर्वी त्यांना नोटीस दिली आहे. गाळे खुले केल्याचे शुक्रवारी समजल्यानंतर त्यांना नोटीस देण्याची सूचना बांधकाम परवाना विभागाचे दीपक भादुले यांना दिली. अनधिकृत असल्याने ते पाडणार आहे.’’
-सुभाष सावस्कर, नगर अभियंता

बांधकाम परवान्यासाठी अर्ज
गाळ्यांचे बांधकाम परवानगीसाठी अर्ज दिला आहे. शाळेस कोणत्याही प्रकारचे अनुदान नसल्याने उत्पन्नाचे साधन म्हणून गाळे बांधण्यात आले. मी गुन्हेगारी केलेली नाही. माझ्या वैयक्तिक लाभासाठी काहीही केलेले नाही. शहरात अनधिकृत बांधकाम इतके आहे. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते.’’
-मनोहर सपाटे, अध्यक्ष, मराठा समाज सेवा मंडळ