आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Illegal Matter To Investigation Action To Co operation Commissioner At Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गैरव्यवहारांच्या चौकशीचे सहकार आयुक्त चौधरी यांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: विसर्जित नागरी सहकारी बँकांतील गैरव्यवहारांची चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी दिले. या बँकांच्या अवसायकांची (लिक्विडेटर) गुरुवारी पुण्यात बैठक घेतली. कर्जवसुली, दोषी संचालकांवरील कारवाई आणि ठेवीदारांच्या देयरकमा परत करण्याबाबत या वेळी चर्चा झाली.
शहरातल्या सहा सहकारी बँकांची अवसायन प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँक बारा वर्षांपूर्वी अवसायनात गेली. त्याचे अद्यापही कामकाज सुरू आहे. त्यानंतर र्मचंट बँक, उद्योग बँक, सोलापूर नागरी औद्योगिक बँक, इंदिरा र्शमिक महिला बँक आणि भारत अर्बन बँक अशा सहा विसजिर्त बँका आहेत. त्यातील कामकाजासंदर्भात सोलापूर जिल्हा ठेवीदार संघाने आक्षेप नोंदवले आहेत.
दोषी संचालकांवर फौजदारी कारवाई होत नाही, गैरव्यवहाराची रक्कम त्यांच्यावर निश्चित झाली; परंतु त्याची वसुली होत नाही, कर्जदारांना सवलत दिली जाते, लाखावरील ठेव परत करण्याची कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी आहेत. प्रत्येक मुद्दय़ावर लेखापरीक्षण करून अहवाल पाठवण्याची सूचना चौधरी यांनी केली.
जिल्हा महिला बँकेच्या संचालकांवर फौजदारी खटले दाखल केले. त्यानंतर उद्योग बँक, र्मचंट बँकेची सहकारी कायदा 1960 च्या कलम 88 अन्वये चौकशी झाली; परंतु दोषींवर फौजदारी खटले नोंदवले गेले नाहीत. उर्वरित बँकांचीही याच कलमान्वये त्वरित चौकशी करून दोषींवर खटले भरण्याची मागणी ठेवीदार संघाने केली. याबाबत 18 मे रोजी सहकार आयुक्तांच्या पुण्यातील दालनात बैठक झाली होती. त्यासाठी संघाच्या प्रमुख सल्लागार जयर्शी खाडिलकर, अध्यक्षा शोभा गवळी उपस्थित होत्या.
विसजिर्त बँकांवर ठेवीदारांचा प्रतिनिधी नियुक्त करण्याची मागणीही संघाने केली होती. शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे चौधरी यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले. या वेळी सोलापूर नागरी बँकेचे अवसायक संजय राऊत, इंदिरा र्शमिक बँकेचे प्रशांत शहापूरकर, भारत बँकेचे बी. एस. कटकधोंड, विशेष लेखापरीक्षक पी. एस. पवार उपस्थित होते.