आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात अवैध उत्खनन; तहसीलदार ठोकडे यांनी दिल्या खाणींना भेटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहर व जिल्ह्यातील दगड खाणींमधून अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी बुधवारी दुपारी कासेगाव, गंगेवाडी भागातील खाणींची पाहणी केली. वैध खाणींमध्येही नियमावलीचे पालन न झाल्याचे आणि र्मयादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी येत्या तीन दिवसांत वैध आणि अवैध खाणमालकांची बैठक बोलावण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ठोकडे यांनी सांगितले.
स्फोटाचे नियमही पाळले नाहीत
गौण खनिज विभागाने जिल्ह्यातील सर्व खाणींची मोजणी करून एकूण 232 खाणी असल्याचे स्पष्ट केले. यातून 23 लाख 76 हजार ब्रास दगड उपसा झाल्याचे समोर आले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये दिलेल्या माहितीत जिल्ह्यात केवळ 61 खाणी असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु जून ते नोव्हेंबर 2013 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व खाणींची तपासणी झाली. यातून 232 खाणी असल्याचे उघड झाले. यानुसार तहसीलदार ठोकडे यांनी दक्षिण सोलापूरमधील खाणींची पाहणी केली. केवळ एका खाणीचा अपवाद वगळता अन्य एकाही खाणीला संरक्षक कुंपण, तो असल्याचा फलक न लावल्याचे, स्फोट करण्यापूर्वीची नियमावली यांचे न झाल्याचे दिसून आले. सध्या दक्षिण सोलापुरात नोंदणीकृत 17 तर अनधिकृत 13 खाणी आहेत.
‘उत्तर सोलापूर’च्या अहवालाकडे लक्ष
उत्तर सोलापूरमधील खाणी व खडीक्रशर बंद आहेत. केवळ 11 नोंदणीकृत खाणी असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी 10 नोव्हेंबर 2013 रोजी सांगितले होते. परंतु गौण खनिजच्या नव्या सवर्ेेक्षणात उत्तरमध्ये सर्वाधिक 61 खाणी आढळल्या. अनधिकृत खाणींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच या खाणींमधून सर्वाधिक नऊ लाख 52 हजार 63 ब्रास इतका दगड उपसा झाला. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांडून खाणी, उपसा व रॉयल्टी यासंदर्भात अहवाल मागितला आहे. यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.
निश्चित कारवाई करणार
दगडखाणींच्या पाहाणीत वस्तुस्थिती आणि कागदोपत्री माहिती यात मोठी तफावत निदर्शनास आली. अनेक ठिकाणी 70 फुटांपेक्षा अधिक उत्खनन झाले आहे. नियमांची पूर्तता झालेली नाही. परवाना तपासणी, रॉयल्टी, प्रत्यक्ष झालेले उत्खनन याची माहिती घेऊ. त्यानंतर दंडात्मक कारवाईचे स्वरूप निश्चित करू.
- शिल्पा ठोकडे, तहसीलदार, दक्षिण सोलापूर