आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाणचालकांच्या ७-१२ उतार्‍यावर चढणार बोजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे उपसा केलेल्या दगडखाणीचालकांना अर्धा टक्के ते रॉयल्टीच्या दुप्पट दंड ठोठावला होता, मात्र या दंडाची समाधानकारक वसुली केली नसल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. दंड वसुलीच्या आकडेवारीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी तहसीलदारांची बैठक घेतली. तसेच दंड वसुलीचे आदेश देत दंड न भरणाऱ्या खाणचालकांच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.
याप्रकरणी बार्शी तालुक्यातील दगडखाणचालकांना बोजा चढविण्यासंबंधी नोटिसाही बजावण्यात आल्या असल्याची मािहती समोर आली आहे. सोलापूर जलि्ह्यातील महसूल प्रशासनाची परवानगी न घेता परस्पर उपसा केलेल्या दगड खाणींची मोजणी करण्यात आली. यामध्ये मोजणीनुसार तालुक्यातील खाणचालकांना दंड करण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांना खाणनिहाय दंड वसूल करण्याचे आदेश दिले. मात्र बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे चार तालुके वगळता इतर तालुुक्यातील तहसीलदारांनी कोणत्याही दंडाची वसुली केली नाही. शिवाय बार्शी येथील दंड वसुली प्रकरणात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत १४ कोटी रुपयांचा दंड असताना फक्त ५० लाख रुपयांची वसुली कशी काय करण्यात आली, असा सवाल उपस्थित करीत महसूल प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. बैठकीत गेडाम यांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावत दंड वसुलीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देत जे खाणचालक दंड भरणार नाहीत, त्यांना नोटिसा द्या, नोटिसीनंतरही दंड न भरल्यास संबंधित खाणचालकाच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढवा. तरीही दंड वसूल न झाल्यास मालमत्ता लिलाव करण्याचे आदेश गेडाम यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
तत्काळ कारवाई करा
खाणचालकांकडून दंड वसुलीविषयी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. बैठकीत तहसीलदारांना तत्काळ दंड वसुलीचा आढावा घेऊन तत्काळ वसुलीचे आदेश देण्यात आले. जे दंड भरणार नाहीत, त्यांच्या उताऱ्यावर बोजा चढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.''
शंकरराव जाधव, महसूल उपजिल्हाधिकारी