आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत विक्रेत्यांकडून रेल्वे पोलिसांवर दगडफेक, सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर रेल्वे स्थानकावरील अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. याचा राग मनात धरून विक्रेत्यांनी आता थेट आरपीएफला लक्ष्य बनवत त्यांच्यावर दगडफेक केली. सोलापूर स्थानकावरील पादचारी पुलावर उभारून त्यांनी दगडफेक केली. दगडफेकीत कोणी गंभीर जखमी झाले नसले तरीही विक्रेत्यांचे धाडस वाढते आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट आहे. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वे प्रशासन रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. शुक्रवार शनिवारी झालेल्या कारवाईत ३० हून अधिक विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईला विरोध करण्यासाठी थेट दगडफेक केली आहे. दरम्यान कारवाई चालू राहील, असे सहायक सुरक्षा आयुक्त गोविंद देवकर यांनी सांगितले.