आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककलेचा दिसला ‘जागर’ सलग चौथ्या दिवशी चित्र पाहण्यासाठी रांग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरचा युवा चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी चित्रकलेच्या माध्यमातून लोककलेचा जागर केला आहे. त्याचा "जागर ट्रॅव्हलिंग शो' साेलापूरचा गौरव करणारा आहे, असे प्रतिपादन प्रिसिजनच्या संचालिका सुहासिनी शहा यांनी केले.
येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात शशिकांतचा धोत्रेच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे. यानििमत्त सोमवारी पाली आर्ट फाउंडेशनच्या वतीने चित्रकार सुदर्शन देवरकोंडा शिल्पकार भगवान रामपुरे यांना ‘प्रिसिजन’चे प्रमुख यतीन शहा आणि सुहासिनी शहा यांच्या हस्ते कला गौरव पुरस्काराने सन्मािनत करण्यात आले. सृजन फिल्म सोसायटीचे अमोल चाफळकर, चित्रकार शशिकांत धोत्रे, पाली आर्ट गॅलरीचे इंद्रा, स्पेनका वॉटर्सचे सुहास आदमाने आदी प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचालन ब्रह्मा चिट्टे यांनी केले तर युवा चित्रकार सचिन खरात यांनी आभार मानले.
शहा म्हणाल्या की, आम्ही शशिकांतकडून जेव्हा "जागर'बद्दल ऐकले तेव्हा हा खूप धाडसी निर्णय वाटला. आता त्याची चित्रे पाहण्यासाठी एखाद्या मंदिरात जशी लोकांची रांग लागते तशी रांग लागलेली दिसली. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आता तो देशभरात आपल्या चित्रांचा प्रसार करणार आहे. "प्रिसिजन'समूह त्याच्यासोबत कायम राहणार आहे.
चित्रकला स्पर्धेत माने, लोखंडे प्रथम
जिल्हापरिषद पाली आर्ट फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियानाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत माहेश्वरी लोखंडे राहुल माने यांनी प्रथम (विभागून), द्वितीय संदीप जाधव दयानंद चव्हाण, तृतीय क्रमांक महिंद्र खाडे युंगाधर साळुंखे यांनी पटकावला. या स्पर्धेत ९२ जणंानी सहभाग घेतला.
चौकटीत अडकवू नका : देवरकोंडा
मुलांनात्यांच्या मनाला येईल तसे वागू द्यावे. त्याला कोणत्याही प्रकारच्या चौकटीत अडकावून ठेवू नका. त्यातूनच कलाकार निर्माण होतो. काहीजण नियमित अभ्यासात हुशार असतात तर कुणी कलेमध्ये पारंगत असतो, याचा विचार करून त्याला जे हवे ते करून द्यावे. शशिकांत धोत्रे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
रामपुरे यांनी जागवल्या जुन्या आठवणी
चित्रकाररामपुरे यांनी वडिलांच्या आठवणी सांगितल्या. अखेरच्या दिवसात त्यांनी मला बोलावूून माझ्याकडे आर्थिक संपत्ती नाही, मात्र कलेचा वारसा आहे. तो सांभाळा, असे सांगितले होते. त्यातून प्रेरणा घेत मी कलेकडे मार्गक्रमण केले. माझा भावांनीही खूप मोलाची मदत केली. त्यांना मी गुरू मानतो, असे रामपुरे म्हणाले.
जानेवारी रोजी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून चित्र पाहण्यासाठी गर्दी झाली. सायंकाळी लोकांची रांग फडकुले सभागृहाच्या आवारापर्यंत आली होती. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी गर्दीत वाढ झाली. विशेष म्हणजे सोमवारी वर्किंग डे दिवशीही सायंकाळी नंतर कलारसिकांची गर्दी होती. या दिवशी कलारसिकांची रांग पािर्कंग गेटपर्यंत पोहोचली होती. फडकुले सभागृहाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचा कलाउत्सव पाहिल्याची भावना व्यक्त केली.