आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Implementing Biometrics System For Gharkul In 8 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुलांसाठी 8 दिवसांत बायोमेट्रिक्स प्रणाली राबवा, मनपा आयुक्तांचे बैठकीत आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पोलिस मुख्यालयाजवळील भगवान नगर झोपडपट्टी जागेत ३७२ घरकुल केंद्राच्या गृहनिर्माण योजनेतून बांधण्यात आली. तेथील ३४२ लाभार्थींची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली असून, त्यांचे बायोमेट्रिक्स करून घरकुल वाटपाचे नियोजन करा, असा आदेश महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी बैठकीत दिला.
केंद्राच्या घरकुल योजनेतून भगवाननगर येथे ३७२ घरकुल बांधण्यात आले. पण तेथील लाभार्थींना घरकुल वाटप केले नव्हते.

याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त काळम-पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला. ३४२ लाभार्थींची यादी तयार असून, त्यातही एकाच कुटुंबातील एकपेक्षा जास्त लाभार्थी असल्याने याबाबत तक्रार आल्याने घरकुल वाटप थांबले होते. याबाबत आमदार शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना विचारणा केली. एका महिन्यात अहवाल सादर करा, असा आदेश आयुक्त काळम-पाटील यांनी यूसीडी विभागाचे लक्ष्मण बाके यांना दिला होता. त्यानुसार लाभार्थींची यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली. बुधवारी महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ३४२ लाभार्थींचे बायोमेट्रिक्स करून यादी सादर करा. त्यानंतर घरकुल वाटप करा पावसाळ्यापूर्वी घरकुल वाटपाचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वाद टाळण्याचा प्रयत्न
३७२घरकुल बांधले तर ४०६ जणांनी अर्ज केल्याने तेथील घरकुल वाटपाचा वाद निर्माण झाला असल्यामुळे लाॅटरी पध्दतीने ३४२ जणांचे यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य वाद टाळण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

पावसाळ्यापूर्वी वाटप केल्यास धोका टळेल
तेथील लाभार्थी पत्र्याचे शेडमध्ये राहत असून, त्या परिसरात सांडपाणी आणि इतर सुविधा नसल्याने आरोग्य धाेक्यात आला आहे. पावसाळ्यात तेथे ग्ंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसा अनुभव दरवर्षी पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे आला आहे. त्यामुळे पावसाळापूर्वी घरकुल वाटप झाल्यास धोका टळेल.
बायोमेट्रिक्स करणार
- चार दिवसांत ३४२ जणांचे बायोमेट्रिक्स करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, त्यानुसार काम सुरू करून ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार आहे.
लक्ष्मण चलवादी, प्र. नगर अभियंता, मनपा