आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Resolution Pending In The University's Seneat Meeting

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात महत्त्वाचे ठराव बारगळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाची सहावी सिनेट तर नूतन कुलगुरू यांच्या उपस्थितीतील पहिलीच सिनेट सभा शनिवारी झाली. सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) व इतर सदस्यांनी एकमेकांचे ठराव तांत्रिक चुका काढत किंवा शब्दांचे कीस पाडत अमान्य करण्याचा खेळ चांगलाच रंगला. सदस्यांनी मांडलेले दोनच ठराव मंजूर होऊ शकले.

कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते. या वेळी कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे आदी उपस्थित होते. सदस्य प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण म्हणाले, नूतन कुलगुरू डॉ. मालदार यांनी उत्तमरीत्या कामकाज चालवले. सर्वांना बोलू दिले. विशेष म्हणजे ज्या विभागाच्या संदर्भातील प्रo्न असतील त्या त्या विभागाच्या प्रमुखांना उत्तरे देण्याची मुभा होती. यापूर्वी असे घडत नव्हते. मात्र, काही ठरावांना सदस्यांकडूनच जाणूनबुजून विरोध झाला.

शिक्षक संघटनेचे सदस्य डॉ. अरुण बारबोले यांनी मिटिंगमध्ये काही ठरावांना विरोध केला. त्यामागे तांत्रिक कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ भावनेच्या भरात ठराव मंजूर करणे योग्य ठरणार नाही. विद्यार्थी हितासाठी ठराव आहेत, असे म्हणणे म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा ठरावांना विरोध करतोय असे होते, तसे मुळीच नाही, असे ते म्हणाले.

एम. फील, पीएच. डी.च्या डेझरर्टेशनचे मानधन वाढवण्यात यावे, अशी सूचना डॉ. एन. बी. पवार यांनी केली. तीही मागे घेतली.
पीएच.डी. प्रबंध व एम.फील प्रबंधिका तपासणीचे मानधन वाढवण्यात यावे ही सूचना प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले यांनी मांडली. नंतर मागे घेतली. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आकारलेल्या शुल्काची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्याची सूचना एस. एस. चौगुले यांनी केली. मात्र, ती अमान्य करण्यात आली.

महाविद्यालयास विनाअनुदानित विषय, तुकडी व शाखा यांना मान्यता देताना शिक्षकेतर कर्मचारी वर्ग भरल्याची खात्री करण्यात यावी ही एन. आर. कांबळे यांची सूचना अमान्य झाली. विद्यापीठ परीक्षा चालू असताना कॅप सेंटरवर पेपर गठ्ठे पोहोचवण्यासाठी 100 पेपरच्या पुढे एक शिपाई देण्यात यावा ही त्यांचीच सूचना होती. तीही अमान्य झाली. तसेच परीक्षा फी वर्ग व सत्रासाठी शिवाजी विद्यापीठाप्रमाणे सारखीच असावी, हीही त्यांची सूचना अमान्य झाली.

कर्मचार्‍यांच्या ओव्हरटाइमच्या दरात वाढ करण्याची सूचना डॉ. टी. एन. कोळेकर यांनी केली. ती अमान्य झाली. विद्यापीठ शिक्षक व कर्मचार्‍यांना अभ्यासक्रम शुल्कात 50 टक्के सवलत देण्याची त्यांची सूचना अमान्य झाली.
नामंजूर झालेले ठराव असे
पीएच.डी. शुल्क दोन सत्रांत घ्यावी, अशी सूचना प्रा. डॉ. सी. एस. चव्हाण यांनी मांडली. त्यावर मतदान झाले. 37 विरुद्ध 10 मतांनी ती फेटाळण्यात आली. पीएच.डी. कोर्स वर्कचा अभ्यासक्रम व शीर्षके ठरवण्याचा अधिकार संबंधित बीओएस व उपसमितीचा असावा, ही त्यांची दुसरी सूचना तांत्रिक कारणाने मागे घेण्यास सभेने मान्यता दिली. सामाजिक शास्त्रे व भाषेतील पीएच.डी.साठी इम्पॅक्ट फॅक्टरची सक्ती रद्द करण्याची सूचनाही मागे घेतली. असे काही ठराव नामंजूर झाले.