आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Solapur Different Fields People Honored By Shivba Ratna Award

जातीयवादाने देश पुढे जातोय की मागे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महिला, विद्यार्थ्यांवर, दलित-मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ होत असताना दिसत आहे. जातीयवाद फोफावत असतानाच्या या काळात देश पुढे जातो आहे की मागे हेच समजत नाही. पण सुशिक्षित युवक सामाजिक भान जपत कार्य करताहेत. हे कौतुकास्पद आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
युवकांच्या सहकार्याशिवाय कोणतेही राज्यकर्तेे परिवर्तन घडवू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवबा समाजसेवी संस्थेतर्फे कृष्णाहरी बोद्दूल स्मरणार्थ विविध क्षेत्रातील व्यक्तींना शिवबारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.
या वेळी भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, संस्थेचे अध्यक्ष निरंजन बोद्दूल, मनोहर कुरापाटी आदींची प्रमुख उपस्थिती होती. अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
वाळवंटात राहण्याची परवानगी हवी
‘गाऊ,नाचू, विठू तुझा करू अनुवाद’ या संतोक्तीप्रमाणे वारकऱ्यांना वाळवंटात राहण्याची परवानगी मिळावी. न्यायालयीन निर्णयाचा आम्ही आदर करतो. बाजू मांडताना आम्ही कमी पडलो. ३६५ दिवसांपैकी ३४० दिवस बंदी घाला. पण वारीच्या २० दिवसात राहण्याची परवानगी मिळावी. वाळवंटात शौचालये नाहीत, सरकारने पुरेसे शौचालय दिले नाही तर आम्ही काय करणार, असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.
यांचा झाला गौरव : संत साहित्यिक दा. का. थावरे यांना निवासस्थानी जीवनगौरव पुररस्कार देण्यात आला. तर कार्यक्रमात ब्रीजमोहन फोफलिया (सामाजिक), शिवाजी सुरवसे (पत्रकार), केवल तिवारी (छायापत्रकार), फिरदौस पटेल (नगरसेवक), वैशाली पाटील, वंदना मिसाळ, मल्लम्मा पसारे, श्रीनिवास चेरमन (शिक्षक), संगीत गेंट्याल (विद्यार्थी) यांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.