आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी लावतो म्हणून तरुणींची फसवणूक, आॅनलाइन पैसे भरण्यास सांगून ३३ हजाराला गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र,गोवा शासनातर्फे संजीवनी आरोग्य योजना सु्रू करण्यात येणार आहे. त्यात आपणाला टेलीफोन आॅपरेटरची नोकरी आहे असे सांगत दूरध्वीनवरून दोघा तरुणांनी सोलापुरातील एका तरुणीला संपर्क साधला. एका दिवसात ई-मेलवरून नियुक्ती पत्र आणि माहिती पत्र पाठवले. लागलीच काही वेळाने एक बँक अकाऊंट देऊन त्यात तेहतीस हजार रुपये भरण्यास सांगितले. तरुणीने आपल्याला नोकरी मिळेल या आशेने बँकेत पैसे भरलेही आणि काही मिनिटांत फोनवरून माहिती विचारण्यासाठी त्यांनी फोन केला असता तो बंदच. आकाशवाणी केंद्राजवळील एमआयडीसी परिसरात राहणा-या पद्मा प्रकाश विटकर (वय २३) या तरुणीची फसवणूक झाली आहे. २२ ते २४ मार्च दरम्यान ही घटना घडली असून, शनिवारी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अन्विटकर फसत गेल्या...
बावीसते चोवीस मार्च या दरम्यान त्यांना मोबाइल (95577084297) या नंबरवरून फोन आला. आपल्याला नोकरी आहे. असे सांगत मेलवरून पत्रही दिले. त्याचवेळी डॉ. रवींद्र यादव यांचा अकाऊंट नंबरवर (1161178696) ३३,५०० रुपये भरण्यास सांगितले. कामावर रूजू होताना विविध कामासाठी वीस हजार रुपये भरले नाहीतर तुमची नियुक्ती रद्द होईल, असे सांगण्यात आले. यामुळे पद्मा यांनी अशोक चौकात एटीएम सेंटरमधून पैसे काढून बँक आॅफ इंडिया शाखेत त्यांनी दिलेल्या अकाऊंटमध्ये पैसे टाकले. पुन्हा मोबाइलवर फोन केल्यानंतर तो फोन बंदच लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले.
सावध राहा....!
कुणीहीआपल्याला सहजासहजी नोकरी देत नाही. दामदुप्पट पैसे करून देत नाहीत. कुठलीही बँक एटीएम कोड, बँक अकाऊंट नंबर मागत नाही. पैशाच्या, नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका. कुणावरही विश्वास ठेवून पैशाचा व्यवहार करू नका. आपणाला फोन, मेल आल्यास खात्री करा. बँकेत जाऊन चौकशी करा. या घटनांमध्ये सावध राहणे हीच सुरक्षा आहे.