आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगाअण्णांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर जिल्हा मराठी पत्रकर संघाचा हीरक महोत्सव कार्यक्रम रविवारी साजरा करत असल्याची माहिती प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी १० वाजता पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य सभागृह पत्रकार भवन येथे होणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. या वेळी वैद्य यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आणि संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन असा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी असतील. आमदार दिलीप सोपल, आमदार प्रणिती शिंदे, समाजसेवक अण्णा डांगे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे पाहुणे असतील.
या वेळी प्रेस फोटोग्राफर नागेश दंतकाळे, मूर्तिकार विजय गाजूल, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मठपती, शशिकांत नारकर, लोकमतचे संपादक राजा माने, ज्ञानेश्वरी कन्नड अनुवादक बी. ए. जमादार, कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, शायर प्रा. बशीर परवाज, इंजिनिअरिंग यश प्राप्त केलेल्या योगेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, सीताराम कुलकर्णी, नाट्य कलावंत सय्यद इक्बाल यांचा विशेष सत्कार होणार आहे. संघ दिवंगत ज्येष्ठ पत्रकार बाबूराव जक्कल, रंगाअण्णा वैद्य, कमलाकर पिंपरकर, व्ही. आर. कुलकर्णी, राजाभाऊ राजवाडे यांच्या पत्रकारितेचा वारसा जपणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...