आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथक आले अन् गेले, अतिक्रमण जैसे थे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वरयात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस परिसरातील १८ मीटर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम महापालिकेने मंगळवारपासून सुरू केली. मात्र, यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही धिम्यागतीने कामकाज सुरू आहे. आज अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक आले, एखाद-दुसरी टपरी हटवली आणि निघून गेले. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे असल्याचे दिसून आले.

सिद्धेश्वर यात्रा काळात नंदीध्वज मिरवणूक पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट मार्गावरून जातात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि नंदीध्वज मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम मनपाने मंगळवारपासून हाती घेतली आहे. मंगळवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे पथक पोलिस बंदोबस्त घेऊन आले. मंगळवारी अतिक्रमण काढण्याची सुरुवात करताच तेथील भंगार आणि मडके विक्रेत्यांनी गर्दी करत नुकसान करू नका आम्ही काढतो असे म्हणत विरोध केला. त्यामुळे पथकाने एक टपरी वगळता काहीच केले नाही. दिवसभर येथील विक्रेते स्वत:हून अतिक्रमण काढत होते.विरोध केल्यावर आयुक्त पाहतील