आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या नियोजित ट्रॅकवर अतिक्रमणाचे अडथळे, २०१३ मध्ये देण्यात आली मुदतवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर ते होटगीदरम्यान असलेल्या रेल्वेच्या मीटरगेजच्या जागेवर रेल्वे प्रशासन आता तिसरी लाइन टाकणार आहे. सोलापूर रेल्वे विभागाच्या दृष्टीने हा नवा लोहमार्ग होणे खूप गरजेचे आहे. गेल्या १८ वर्षांपासून रेल्वेचे दुर्लक्ष झाल्याने या मार्गावर बेकायदा घरे उभारली आहेत.

सुमारे १३३० घरांना दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली. मुदत उलटून गेली आहे. तरी येथील लोक अद्याप घरे सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत. खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी विभागीय व्यवस्थापक जॉन थॉमस यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनही सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन खरंच हे अतिक्रमण हटवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फताटेवाडी येथे एनटीपीसीचा प्रोजेक्ट सुरू होत आहे. प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर कच्चा माल रेल्वेने सोलापुरात दाखल होणार आहे. रेल्वेची माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार असल्याने याचा फटका अन्य प्रवासी गाड्यांना होऊ नये. म्हणून सोलापूर ते होटगी दरम्यान नवा लोहमार्ग टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबवून राहावे लागणार नाही. १५ ते २० मिनिटे वाचणार आहेत.
१९९७नंतर उभारली बेकायदा घरे

१९९७पर्यंत सोलापूर ते होटगी दरम्यान मीटरगेजवरून वाहतूक होत होती. त्यानंतर रेल्वेचा प्रवास ब्रॉडगेजने होऊ लागला. त्यामुळे मीटरगेजची जागा रिकामी पडली. याचाच फायदा घेत अनेकांनी येथे बेकायदेशीर घरे उभारली. रेल्वेच्या सुमारे १०० ते १५० एकर जागेवर ही अतिक्रमणे उभारली गेली आहेत.

रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी तत्कालीन रेल्वे अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना घरे खाली करण्यास प्रशासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ उलटूनही वर्ष सरले. अद्याप घरे आहे तशीच आहेत.

- खासदारांच्या भेटीनंतर १० दिवस कोणतीच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप १० दिवस पूर्ण व्हायचे आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करेल. कारवाईबाबत आताच काही बोलणे घाईचे ठरेल.” नर्मदेश्वरझा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक

सोलापूर ते होटगीदरम्यान असलेल्या रेल्वेच्या मीटरगेजच्या जागेवर घरे उभी राहिली आहेत. त्यांना नोटीस देऊनही ती रिकामी केलेली नाहीत.