आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटीबस वाढवूनही उत्पन्न ‘जैसे थे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिकेने खरेदी केलेल्या २१ बसगाड्या टायर आणि इतर पार्ट नसल्याने तीन महिन्यांपासून बंद आहेत. तर जेएनयूआरएम योजनेतून आलेल्या तीन व्हाॅल्वो बसगाड्या बंद आहेत. अशा एकूण २४ बसगाड्या बंद आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये दहा व्हॉल्वो बसगाड्या आल्या होत्या. त्याची देखभाल दुरुस्तीची मुदत वर्षापर्यंत होती. ती संपल्याने तीन गाड्या बंद आहेत. ६८ बसगाड्या धावत असताना रोजचे उत्पन्न ४.५ लाख हाेते. आता त्यात १७ बसगाड्यांची वाढ होऊनही उत्पन्न जैसे थे आहे. त्यामुळे बसगाड्या िरकाम्या धावत असल्याचे स्पष्ट होते.

नियोजन नसल्याने परिवहन खड्ड्यात
परिवहनव्यवस्थापक परिवहन डेपोत कधीच आले नाहीत. बसचे नियोजन करत नाहीत. त्यामुळे नवीन बस असून, शहरातील नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही. यास सत्ताधारी कारणीभूत आहेत.” अनिलकंदलगी, विरोधपक्षनेता, परिवहन समिती