आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inconvenience Of Patients, Employees, Latest News, Divya Marathi

रुग्ण, कर्मचार्‍यांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिव्हिलमधील क्ष-किरण विभागातील स्वच्छतागृह काढून घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृह केले आहे. त्यामुळे क्ष-किरण विभागात तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांचे व कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत. याबाबत विभागाच्या वतीने अधिष्ठाता यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप उपाययोजना केली नसल्याची माहिती क्ष-किरण विभागाचे विभागप्रमुख डॉ. विवेक चौधरी यांनी दिली.
क्ष-किरण विभागात एकूण 40 कर्मचारी काम करतात. तर दररोज 10 ते 20 पेशंटची तपासणी येथे करण्यात येते. तसेच या विभागात डॉक्टर, तंत्रज्ञ, सिस्टर, महिला, तंत्रज्ञ तसेच चतुर्थर्शेणी कर्मचारी हे सर्व कर्मचारी 24 तास सेवा करत असल्यामुळे ओपीडी क्ष-किरण विभागात स्वच्छतागृहाची सोय आसणे आवश्यक आहे. क्ष-किरण विभागात आयव्हीपी, साईनोगॅ्रम, बीइनिमा रुग्णांना स्वच्छतागृहाची सोय अत्यावश्यक आहे. क्ष-किरण विभागात आजपर्यंत स्वच्छतागृहाची सोय नाही. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र रूम नाही. 12 फेब्रुवारी 2014 पासून क्ष-किरण ओपीडी विभागातील स्वच्छतागृह काढून घेतल्यामुळे रुग्णसेवेत अडथळा निर्माण होतो. सर्व क्ष-किरण विभागातील अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची गैरसोय होणार आहे. तातडीच्या विभागातील स्वच्छतागृहाची सोय फक्त महिला डॉक्टर, तेथील परिचारिका व इतर कर्मचारी यांच्यासाठी असल्यामुळे क्ष-किरण विभागातील कर्मचारी रुग्णसेवा सोडून व अत्यावश्यक सेवा व एमएलसी एक्स-रे सोडून इतर विभागाच्या कर्मचार्‍यांना स्वच्छतागृहात जाणे गैरसोयीचे होते. स्वच्छतागृह त्वरित देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अपंगांचे स्वच्छतागृह बंदच
अपंगासाठी बनवण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे क्ष-किरण विभागाचे स्वच्छतागृह देण्याऐवजी अपंगासाठी बंद असलेले स्वच्छतागृह देण्याचीही मागणी डॉक्टरांनी केली.
अपंगांसाठीचे स्वच्छतागृह अनेक वर्षांपासून बंदच आहे.