आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन उद्योगात भारत २०२० मध्ये जगात तिसरा देश असेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहन उत्पादन आणि विक्री क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करतोय. २०२० मध्ये वाहन उद्योगाच्या उलाढालीत चीन, अमेरिका यानंतर भारत तिस-या क्रमांकाचा देश होईल.

चीनच आपल्यापेक्षा १०० वर्षे पुढे
श्री.कडलासकर म्हणाले, वाहन उद्योगात सध्या भारताचा सातवा क्रमांक आहे. भारतात हजार लोकांमागे ११ लोक चारचाकी गाडी वापरतात. श्रीलंकेत हे प्रमाण हजार लोकांमागे १२ असे आहे, मात्र भारतातील वाहन उद्योग झपाट्याने विस्तारतोय. चीन आपल्यापेक्षा पुढे आहे आणि ते पुढेच राहतील. ते आपल्यापेक्षा १०० वर्षे पुढे आहेत विकासाचा वेगही १०० पट. हा वादाचाही विषय होऊ शकेल. पण चीनने उद्योगांच्या वाढीसाठी पुरक अशी धोरणे आखली आहेत. त्यामुळे ते अग्रस्थानी राहतील.

चीनप्रमाणे आपणही करू शकतो वाटचाल
‘मेकइन चायना’ आणि ‘मार्केट इन ग्लोबल’ असे चीनच करू शकते असे नाही. भारतालाही हीच संधी आहे. ‘मेक इन इंडिया’ म्हणणे हे त्यादृष्टीने पहिले पाऊल आहे. भारतात केवळ उत्पादन करा म्हणणे म्हणजे पर्यायाने हेच अभिप्रेत आहे, मार्केट ग्लोबल आहेच.

इलेक्ट्रिक गाड्यांची संख्याही वाढेल
सध्यापेट्रोल आणि डिझेल इंधनावर चालणारी वाहनच तयार होत आहेत. भविष्यात हायब्रीड म्हणजे इलेक्ट्रिक आणि डिझेल अशा संमिश्र इंधनावर चालणा-या वाहनांची निर्मिती होऊ शकते. भविष्यात इलेक्ट्रिक गाड्याही वाढू शकतील.

प्रदूषणविरहित वाहने हे आव्हानच
सोलापूर शहरासाठीस्पेशल निकषाचे पेट्रोल विक्री करण्यात येते. यासाठी २००६ पासून आतापर्यंत या नॉर्म्सनुसारचे महागडे पेट्रोल घेऊन पन्नास एक कोटी रुपये खर्च केले असतीलही. सोलापूर शहर हे निकषाचे पालन करणारे आहे, या संवादावेळी मर्सिडीझ बेन्झ इंडियाचे संचालक शेखर तुळशीबागवाले, प्रा. मुरली अय्यंगार, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रमोद वैद्य उपस्थित होते.

वाहन उद्योगासमोरप्रदूषणविरहित वाहनांची निर्मिती हे आव्हानात्मक आहे. काही शहरांसाठी ‘युरो नॉर्म्स’ बनविले गेले आहेत. ‘युरो ३’ च्या नार्म्सनुसार करण्यात आलेल्या मानांकनामध्ये भारतातील पुणे, मुंबई, चेन्नई अशा एकूण १३ शहरांचा समावेश होता.