आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Not Have L Been Complete If Twenty Years: Sesarava More

...तर वीस वर्षेही भारत अखंड राहिला नसता : शेषराव मोरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गांधीच्या काळात ज्या अटी अखंड भारतासाठी लादण्यात आल्या होत्या. त्या जर घटना म्हणून स्वीकारल्या असल्या तर 20 वर्षेही अखंड भारत राहिला नसता. असे मत ज्येष्ठ इतिहास विश्लेषक शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. लक्ष्मी को. ऑफ बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रंसगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रेवण चडचणकर, लक्ष्मीकांत कोंडा, डॉ. बिपीनभाई पटेल, पुरणचंद्र पुंजाळ, मार्गदर्शक दिलीप सुकळीकर, मोतीलाल भोळा, निवृत्ती केत, बसवराज बोडा आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाले की, फाळणी होण्याच्या अगोदर गांधीजी देश एकसंघ राहावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले. फाळणी होऊ नये म्हणून जी काही लिखित घटना देशावर लादण्यात येणार होती. त्यामुळे सामान्य माणूस भरडला जाणार होता. शिवाय त्यात धर्माचाही प्रश्न निर्माण झाला असता मात्र गांधींनी त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला म्हणून आज दोन्ही देश सुखाने नांदत आहेत. मनाने विटलेल्या या देशांनी एकत्रीत असणे योग्य नव्हतेच.
प्रास्ताविक बँकेचे बसवराज बोडा यांनी केले तर सूत्रसंचालन संजय एकबोटे यांनी केले. या वेळी बँकेचे उमाकांत मेंढापुरे, नरसप्पा गुंजोटी उपस्थित होते.