आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Farmers Association,Latest News In Divya Marathi

गारपीटग्रस्तांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज पाच वर्षांच्या मुदतीवर देण्याची मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. याबाबत संघाची बैठक झाली. संघटनमंत्री दिनेश कुलर्णी अध्यक्षस्थानी होते. तीत मदतीसंदर्भात चर्चा झाली. गारपिटीने केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर गाई-म्हशी, शेळ्या, कोंबड्याही दगावल्या. त्यामुळे शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाची साधनेच संपली. ही स्थिती सुधारण्यासाठी अर्थसाह्य खूप महत्त्वाचे असल्याचे बैठकीत ठरले. या वेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शहाणे, बापूराव सारोळकर, संगमेश्वर निलंगे, मृत्यूंजय कल्याणी, संतोष अक्कलकोटे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी, धीरज छप्पेकर आदी उपस्थित होते.
शैक्षणिक शुल्क माफ करा
गारपीटग्रस्त शेतकरी मोठय़ा संकटात सापडले. उदरनिर्वाहाची साधने संपली. मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशा स्थितीत त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत केली, परंतु ती अपुरी आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकर्‍यांना बराच वेळ लागेल. दरम्यान मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने विचार करावा, असे संघटनेने म्हटले आहे. याबाबत काढलेल्या पत्रकावर जिल्हाध्यक्ष नीलेश शिंदे, शहर संघटक सचिन बिराजदार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप कांचन यांच्या सह्या आहेत.