आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत इसापनीतीवर ऑपेरा पाहिला, तसे काही इथे व्हावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘अमेरिकेला गेले असताना तिथे इसापनीतीतील गोष्टींवर एक म्युझिकल ऑपेरा पाहिला. तो खूप सुंदर होता. त्यात सगळे होते, अभिनय, नृत्य, गायन, नाटक, संगीत. सगळी पात्रे गाणारी होती. असे काही म्युझिकल्स आपल्याला इथे करता येईल का? त्यासाठी पौराणिक कथाबीज घेता येईल का? आता केवळ एकपात्र गाणारे चालणार नाही. त्यामुळे असा काही सुवर्णमध्य काढून युवा पिढीला आकर्षक वाटेल असे नाटकाला वळण देता येईल का? हे पाहिले पाहिजे.’
अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा, ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांची ही विचार श्रृंखला. त्यांनी शुक्रवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी रंगलेल्या गप्पांमध्ये त्यांनी आपल्या आठवणी, भावविश्व आणि विचारांचा पट उलगडला. एका कार्यक्रमानिमित्त त्या सोलापुरात आल्या आहेत. प्रेक्षकांच्या, विशेषत: नव्या पिढीच्या बदलेल्या रुचीकडे लक्ष वेधत त्यांनी नाटकाच्या स्वरूपात बदलाची गरज सुचवली. त्या म्हणाल्या, आता तीन अंकी, चार अंकी नाटक नाही चालणार. दोन-तीन तासांत नाटक संपले पाहिजे. मुख्य म्हणजे हल्ली संहिता नाहीच.

पंडित रविशंकर यांची दाद : पंडितरवी शंकर ‘कट्या’ पाहायला आले. वेळेअभावी आल्याने एकच अंक (अडीच तासांचा) पाहून जाणार होते. मात्र, त्यांना नाटक आवडल्याने साडेनऊला सुरू झालेल्या नाटकाचा पहाटे साडेतीनपर्यंत आस्वाद घेतला. बुवा गायचे तेव्हा येऊन ते दाद देत. हा अनुभव आजही अविस्मरणीय आहे.

..आणि कट्यारसाठी जरिना मिळाली
‘गीतगायिले’च्या प्रयोगाला मास्तर दारव्हेकर आले होते. ते ‘कट्यार काळजात घुसली’ची संहिता लिहित होते. माझा प्रयोग पाहिल्यावर त्यांना माझ्या रूपाने जरिना मिळाली. सोलापूरच्या रेल्वे ड्रॉमॅिटक क्लबच्या मंडळातून ‘तूज आहे तुजपाशी’मधून जब्बार पटेल यांच्यासोबत केलेल्या कामाची आठवण केली. शिवशरण, ‘डॉक्टर क्लब’चे कलावंत , मुक्तांगणमधील प्रयोगांची गर्दी आदींच्या क्षणांना त्यांनी उजाळा दिला.
सुशीलकुमार शिंदे स्त्री पात्र साकारत
दोनवर्षांची होते, त्यावेळी परिवार पुण्याहून सोलापूरला आला. सतराव्या, अठराव्या वर्षी मुंबईला गेले. आता पुण्यात आहे. डफरीन चौकात पेट्रोल पंप आहे. पूर्वी तेथे शाळा होती. तिथे दहावीपर्यंत शिकले. अकरावीसाठी हरिभाई देवकरण प्रशालेला आले. सुशीलकुमार शिंदे न्यू प्रायमरी या आमच्याच शाळेच्या नाईट स्कूलमध्ये शिकायचे. दोन्हीचे स्नहेसंमेलन एकत्र व्हायचे. शिंदे यांनी बऱ्याच वेळा स्त्री पात्र केल्याचे आठवते.