आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्पर बदलले निवडणूक चिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील उंबरगे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक अधिकारी म्हणून एस. व्ही. कुंभार यांनी चिन्हांकित यादीचे जाहीर प्रसिद्धीकरण केल्यानंतर परस्पर उमेदवारांचा चिन्हामध्ये बदल केला आहे. निवडणूक नियमानुसार जाहीर प्रसिद्धीकरण केल्यानंतर चिन्हांमध्ये बदल करता येत नसताना अधिका-यांनी राजकीय दबावाला बळी पडून वरील कृत्य केले आहे. याची चौकशी करून संबंधित अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी सिद्धाराम बाके यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

निवडणूक अधिकारी कुंभार यांनी उमेदवारांची चिन्हांकित यादी एप्रिल रोजी जाहीर करून त्याचे प्रसिद्धीकरणही केले. मात्र कुंभार यांनीच मतपत्रिका नमुनापत्रिकावरील चिन्हामध्ये बदल केला आहे. नमुना नुसार केलेल्या प्रसिद्धीकरणामध्ये कल्याणी मारुती आळगी यांचे चिन्ह नारळ असे नमूद केले असताना दुस-या यादीत म्हणजेच बदल केलेल्या यादीमध्ये कल्याणी मारुती आळगी यांचे चिन्ह पतंग असे नमूद केले आहे. नारळ या ठिकाणी हाताने खोडून पतंग असे लिहिण्यात आले आहे. कुंभार यांच्या वर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.