आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रायणी एक्स्प्रेस झाली नऊ वर्षांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुरुवातीला पुणेकरांचा कडाडून विरोध, त्यात १५ दिवसांकरता ट्रायल म्हणून सुरू झाली, १५ दिवसांत चांगला प्रतिसाद िमळाला आणि त्यानंतर गाडी कायमस्वरूपी असावी म्हणून प्रयत्न झाले. आणि ती हक्काने, नित्यनेमाने धावत आहे. हे सारे वर्णन आहे पुणे - सोलापूर धावणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसचे. २० एप्रिल २००६ रोजी सुरू झालेली गाडी हुतात्मा एक्स्प्रेसनंतर सोलापूरकरांची हक्काची बनली आहे. पुणे-सोलापूर -पुणे इंटरसिटी असे नाव रेल्वे प्रशासनाने या गाडीचे ठेवले आहे. मात्र, सोलापूरकर आता ितला इंद्रायणी एक्स्प्रेस नावाने ओळखतात.

मुंबई-पुणे अंतर कापणारी इंद्रायणी सोलापूरला आली. पाहता पाहता ती सोलापूरची इंद्रायणी एक्स्प्रेस झाली. १७ डब्यांची ही गाडी गेल्या वर्षांपासून धावत आहे. या गाडीची १६८४ प्रवासी क्षमता आहे. रेल्वेला रोज लाख ३५ हजार १०० रुपयांचे उत्पन्न एका फेरीतून िमळते. याचे गणित केल्यास गेल्या वर्षांत या गाडीने कोटी १० लाख ६३ हजार ८८० प्रवाशांची दोन्ही बाजूने वाहतूक केली आहे आणि यातून रेल्वेला २२० कोटी १६ लाख हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गायकवाड यांचा पुढाकार
पुणेयार्डात पडून असणारी ही गाडी सोलापूरला गेल्यास स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होईल असे म्हणत पुण्याच्या अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. तेव्हाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी प्रभावीपणे पाठपुरावा केला आणि त्यास यश मिळाले.
गरज होती. ती गरज इंद्रायणी एक्स्प्रेसने पूर्ण केली. ही गाडी अद्याप पुणे-साेलापूर इंटरसिटी या नावाने ओळखली जाते. १० व्या वर्षात पदार्पण करताना गाडीस नामकरण करण्याची मागणी करणार आहे. हर्षदमोरे, अध्यक्ष,िजल्हा प्रवासी संघ

गाडीचीवेळ सोयीची असल्याने सोलापूरकरांसाठी जमेची बाब ठरली आहे. पुण्यासाठी आणखी एका गाडीची गरज आहे. त्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. संजयपाटील, प्रवासीसंघटना