आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रायणी एक्स्प्रेसपासून कामकाज सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न मिटवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी दिल्याने तिकीट पर्यवेक्षकांचा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या इंद्रायणी एक्स्प्रेसपासून तिकीट पर्यवेक्षकांनी गाडीवर हजेरी लावली होती.

रेल्वे पोलिस दलाचे जवान करमवीर सिंगने दौंड रेल्वे स्थानकावर सोलापूरचे तिकीट पर्यवेक्षक महेश शुक्ला यांना मारहाण केली होती. त्याचा निषेध व्यक्त करत व अशा प्रकारांना आळा बसावा, रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया तिकिट चेकिंग असोसिएशनने संप पुकारला होता. फलाट एकवर धरणे आंदोलन झाले. त्यानंतर डीआरएम कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे चर्चा घडली. यात र्शी. थॉमस यांनी तिकीट पर्यवेक्षकांच्या सुरक्षितेबद्दल गंभीर असून येत्या काळात अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच काम करताना येणार्‍या अडचणीदेखील सोडवण्यासाठी उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक के. मधुसूदन, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एस. क्यू. हुसेन, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी रामचंद्र बरकडे आदींसह नॅशनल रेल्वे मजदूर युनियचे मध्य रेल्वेचे साहाय्यक सचिव डी रमेश बाबू, विभागीय सचिव सुनील लोखंडे, नसीर शेख, तिकीट चेकिंग असोसिएशनचे अध्यक्ष पी. बी. गायकवाड, एन. ए. हकिम, प्रीती भोसले, शिल्पा भालेकर, रियाज शेख आदी उपस्थित होते.