आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमता, विकास, संधींसाठी साजरा होईल उद्योग दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उद्योग दिवस’ साजरा करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे. त्यासाठी विश्वकर्मा जयंतीचे निमित्त सुचवले. फेब्रुवारीला जयंती असून, त्याच्या तयारीसाठी खुद्द जिल्हाधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्र िनयोजन करत आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योग एका मंचावर आणून त्याच्या क्षमता, विकास आणि संधी दाखवून देणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे शासन आदेशात उल्लेखले आहे.
राज्याचा आैद्योगिक विकास घडवण्यासाठी आैद्योगिक धोरण जाहीर झाले आहे. त्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ ही नवी संकल्पना मांडण्यात आली. नवीन उद्योजक िनर्माण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा नव्या संकल्पनेमागचा उद्देश. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक योजना आणत आहेत. जिल्हानिहाय उद्योग दिवस साजरा करणे हाही त्यातीलच एक भाग. जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग समूहांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या उपायांची चर्चा करणे, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे, असे उद्योग खात्याचे उपसचिव संजय देगांवकर यांचे म्हणणे आहे.
औद्योगिक विकास क्षमतेचे दर्शन
उद्योगजिल्ह्याचा प्रगती आलेख दर्शवणारा असताे. जिल्हानिहाय उद्योग दिवस साजरा झाल्यास त्या जिल्ह्याची आैद्योगिक क्षमता आणि विकास दिसून येते. सोलापूर जिल्ह्याची आैद्योगिक प्रगती सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी मिळाली असून, उद्योग दिवस जोरदार साजरा करू.” तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी
उद्योजकांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल
विश्वकर्मानिर्मितीचे जनक होते. त्यांच्या जयंतीचे आैचित्य साधून उद्योग दिवस साजरा केल्याने उत्पादकांना प्रेरणा मिळेल. नवनिर्मितीला चालना िमळेल. सर्व उद्योग समूह एका मंचावर आल्यास त्यांच्या अडचणी समजून घेता येतील. प्रगतीचे मार्ग दिसतील. त्यामुळे सरकारच्या अशा िनर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.” सत्यरामम्याकल, अध्यक्ष, टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन आदेशानुसारिनयोजन करत आहोत.

राज्यसरकारचा आदेश बुधवारी सायंकाळी िमळाला. उद्योग दिनाचे नियोजन करण्यासाठी फक्त दोनच दिवस आहेत. गुरुवारी दुपारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तीत प्राथमिक रूपरेषा ठरवली. शुक्रवारी कार्यक्रम िनश्चित होतील. वेळ कमी असल्याने धावपळ होत आहे.” सतीशशेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र