आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च अखेर 340 रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक, येत्या आठवड्यापासून सुरू होणार यंत्रणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यातील नवीन सरकारने धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ९० तर जिल्ह्यातील २५० दुकानांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवड्यापासून सुरू केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बायोमेट्रिक यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. एका दुकानामध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी २८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार शहर-जिल्ह्यातील ३४० दुकाने पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तत्काळ दुसऱ्या टप्प्यात निधी दिला जाणार आहे. बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रत्येक दुकाननिहाय डेटा तयार करण्यात आला आहे. येत्या आठवड्यापासून हा डेटा संबंधित मशिनमध्ये भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले.
नावीन्यपूर्ण योजनेतून बायोमेट्रिकसाठी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४० दुकानांमध्ये मार्चअखेरपर्यंत ही यंत्रणा सुरू करण्यात येईल.” तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी, सोलापूर
काय आहे बायोमेट्रिक?
बायोमेट्रिकयंत्रणा बसवण्याचा मुख्य उद्देश हा धान्याचा काळाबाजार रोखणे असेल. यासाठी एका कुटुंबातील िकमान दोन व्यक्तींचे थम्ब इम्प्रेसन घेण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक कार्डधारकास स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून संबंधित मशिनवर थम्ब इम्प्रेसन घेण्यात येईल. यानंतरच त्या व्यक्तीला धान्य देण्यात येणार आहे. बोगस व्यक्तीला वा एकाच्या नावावर दुसऱ्यास धान्य देण्यावर आळा बसणार आहे.