आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Is The Economic Politics Says Chandrashekhar Tilak

महागाई हे आर्थिक राजकारण आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सध्या अर्थकारण वेगाने बदलत चालले आहे. रूपयाचे अवमुल्यन होत नाही तर घसरण होत आहे. म्हणून महागाई हे अर्थिक राजकारण आहे, तर चालनाचे अवमुल्यन राजकीय अर्थकारण आहे, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.

सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शारदीय व्याख्यानमालेतील शुक्रवारी टिळक यांनी अर्थकारण व रूपयाची घसरण या विषयावरील सातवे पुष्प गुफंले.

महागाईच्या काळात देशात गुंतवणूकीसाठी पैसा शिल्लक आहे का हाच मोठा प्रश्‍न आहे. रूपयाचे आवमुल्यन होत आहे. त्याला काही अंशी सरकारही जबाबदार आहेराजकीय नेतृतव आणि प्रशासकीय व्यवस्था एखाद्या देशाकडे असेल तर त्या देशाची आर्थिक ताकद आणि चालनाचे मूल्य नक्कीच बळकट होते. असेही ते म्हणाले.

अर्थकारणानुसार रुपयाचे मूल्य बदलते
टिळक यांनी रुपयाचे मूल्य जागतिक अर्थकारणानुसार कसे बदलते आणि सरकारी धोरण भारतीयांचा सोन्याचा हव्यास, खनिज तेलाची अर्मयाद आयात आणि भारतातून होणारी तुटपुंजी निर्यात इत्यादी घटकांचा चलनावर आणि महागाई निर्देशंकावर कसा परिणाम होतो याविषयी मार्गदर्शन केले.

अनावश्यक गोष्टींवर खर्च
भारतीयांनी सोने आणि परदेशी सौंदर्य प्रसाधने या सारख्या अनावश्यक गोष्टींचा वापर कमी केला आणि सरकारने उद्यमशीलतेला प्रोत्साहन देवून देशातंर्गंत उत्पादनाला प्रोत्साहन दिले तर आपले बरेच परकीय चलन वाचू शकेल. आणि रूपया तसेच आपली अर्थव्यवस्था विनाशाकडे जाण्यापासून वाचू शकेल, असेही अर्थशास्त्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी सांगितले.

एका वर्षात 1 हजार टन सोने आयात
भारताने 2012 मध्ये एका वर्षात तब्बल 1 हजार 92 टन इतके सोने आयात केले. तर इतर अनावश्यक गोष्टीमध्ये 1 लाख डॉलरची आयात केली आहे. मात्र अशा प्रकारातील व सोन्यातील गुंतवणूक ही अनावश्यकच मानली जाते.