आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकास आणि शहराची पुनर्रचना करण्याची गरज - ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - साखर कारखान्यांची वाढती संख्या, एनटीपीसी, विमानतळासारखे प्रकल्प यामुळे सोलापूरच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शहर विकास आणि शहराची पुनर्रचना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी केले. होम मैदान येथे शुक्रवारपासून बांधकाम व बांधकाम साहित्यविषयक प्रदर्शनाला सुरुवात झाली. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण मगर यांनी केले.
मंचावर आमदार दिलीप माने, ‘क्रेडाई’चे प्रदेश उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, प्रदीप पिंपरकर, किशोर चंडक, शशिकांत जिद्दीमनी, महावीर वेद, नगरसेवक दिलीप कोल्हे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष सुनील फुरडे यांनी किल्ला आणि माळढोक प्रश्नामुळे शहरातील बांधकाम रखडल्याचे सांगितले.
पालकमंत्री म्हणाले..
बांधकाम क्षेत्र हे मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे आहे. स्वत:चे एक घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. या क्षेत्रात क्रेडाई खात्री देते. माळढोक क्षेत्रासंदर्भात शासन पातळीवर लवकरच निर्णय होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला आहे.
गुडेवारांना का बोलावले नाही
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना प्रदर्शन उद्घाटनासाठी का बोलावले नाही, असा प्रश्न आमदार दिलीप माने यांनी आपल्या मनोगतात उपस्थित केला. समारोप कार्यक्रमास ते उपस्थित राहणार असल्याचे ‘क्रेडाई’च्या वतीने सांगण्यात आले.
मगर म्हणाले..
0शहर विकास आराखडा 25 वर्षांचा असावा
0आराखड्यानुसार मोठे रस्ते असणे आवश्यक
0आराखड्याची गरज पालिकेला नव्हे आपल्याला
0शहर विकासासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे
106 स्टॉल; 9 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले
नऊ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 पासून प्रदर्शन सुरू असेल. 106 स्टॉल असून त्यात शहरातील जागा, बांधकाम, वसाहत, दुकाने, अपार्टमेंट, प्लेवर स्टाइल, ग्रेनाईट, सोलर, इलेक्ट्रिक साहित्य, गृह कर्ज देणारे वित्तीय संस्था, पंप, सिमेंट कंपन्या, दरवाजे, फरशा, स्टील कंपन्या, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन संच, पाइप, शुद्ध पाण्याचे संच आदीचा समावेश आहे.