आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Innovation News In Marathi,Accident, Science Exhibition, Solapur

..तर अपघात झाल्याची माहिती मिळेल तत्काळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अपघात झाल्याची माहिती तत्काळ पोलिस, हॉस्पिटल आणि नातेवाईक यांना मिळावी आणि घटनास्थळी त्वरित मदत उपलब्ध व्हावी याकरिता अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवीन अँप्लिकेशन शोधन काढले असून अपघात घडताच काही सेकंदात ही माहिती स्मार्ट फोनद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचणार आहे.
ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनद्वारे चालणारे अनोखे असे अँक्सीडेंट डिटेक्शन सिस्टिम अँप्ससह विविध असे 35 नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी तत्काळ कशी मदत पोहोचविता येईल यावर वेगवेगळे प्रयोग याठिकाणी पाहायला उपलब्ध करण्यात आलेले आहे.
अँक्सीडेंट डिटेक्शन सिस्टिम हा अभिनव प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. बर्‍याचदा अपघात झाल्यानंतर त्या वाहनांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येतात. वेळेवर मदत न मिळाल्याने अनेक समस्यांही उद्भवतात. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. यावर तोडगा म्हणून येथील विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवर चालणारे अँक्सीडेंट डिटेक्शन सिस्टिम हे अँप्स तयार केले आहे. हे अँप्स वाहनात बसविल्यानंतर सेन्सरद्वारे गाडीचा वेग, रस्त्यावरील वळण या बाबतची माहिती लगेच मोबाइलवर येणार आहे.
शिवाय सेन्सरला जोडण्यात आलेल्या विविध नंबरमुळे जर गाडीचा अपघात झाला तर त्याचे ठिकाण कोणते आहे, याची माहिती मोबाईलवर मिळेल. त्यामुळे रेस्क्यू टिम अथवा नातेवाईक घटनास्थळी तत्काळ पोहोचू शकतील.
गती प्रसरणाचे नवे तंत्रज्ञान
वाहनातील गिअर बॉक्समध्ये घर्षणामुळे पेट्रोल वाया जाते. मात्र, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट गिअर बॉक्समध्ये चुंबकीय पद्धतीचा वापर केला. यामुळे कमी घर्षण होते, परिणामी पेट्रोलही वाचते. बॉक्सची कालर्मयादा वाढते. मेंटेनन्सचा खर्च कमी येतो.
अपघात रोखण्याचे प्रयोग
वाहनांचा अपघात घडल्यानंतर तत्काळ त्याचे ठिकाण कळविणारे, बस डेपोतून गाडी निघाल्यानंतर कोणत्या बसस्टॉपवर पोहोचायला किती वेळ लागेल याची माहिती देणारे आदी प्रयोग प्रकल्पाद्वारे सादर करीत विद्यार्थ्यांनी प्रतिभेचा आविष्कार घडविला.