आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inter University Diving Compettetion Issue Solapur

संधी असेल तर मिळवून द्या; विद्यापीठास आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जागतिक आंतरविद्यापीठ डायव्हिंग स्पर्धेची केतन शिंदे यास अजूनही कोलकाता विद्यापीठाकडून संधी मिळू शकते, असा दावा सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. प्रवेश पत्रिका रशियाला गेली तरीही विद्यापीठ प्रशासन चूक मान्य करण्यात तयार नाही. दुसरीकडे संधी असेल तर मिळवून द्या; सोने करून दाखवतो, असे आव्हान केतन शिंदे दिले आहे.

सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बी. एम. भांजे यांनी याबाबत पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, डायव्हिंग स्पर्धेबाबत एआययूने सोलापूर विद्यापीठाला कळवले नव्हते. तरीदेखील शिंदेला संधी देण्याबाबत ‘कोलकाता’ला ई-मेल केला होता. 5 जून रोजी चाचणीला जाण्यासाठी कुलगुरूंनी मान्यताही दिलेली आहे. त्याला स्पर्धेबाबत वेळेत कळवले असल्याने विद्यापीठाची कोणतीही चूक नाही. त्याची 3 व 4 जून रोजी परीक्षा असल्याने 5 जूनला जाण्याचे नियोजन त्याने करणे आवश्यक होते.

संधी द्या, सोनं करतो
मेल व वेबसाइट पाहणे हे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे काम आहे. चाचणी 5 जूनला असल्याचे मला मित्रांकडून कळाल्यावर मीच क्रीडा समन्वयक प्राध्यापक किरण चोकाककर यांना लगेच भेटून सांगितले होते. 5 जूनला सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगीचा मेल पाठवावा, असे या निवड चाचणीचे समन्वयक कुणाल चटर्जी यांनी मला सांगितले होते. तरीही विद्यापीठाचा मेल एक वाजेपर्यंत गेला नाही. मला परत चटर्जी यांचाच फोन आला की मेल वेळेत न आल्याने तुझा निवड चाचणीसाठी विचार झाला नाही. संघ जाहीर झाला. प्रवेश पत्रिका रशियाला गेली, असे शिंदे याने सांगितले.