आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय माती दिवस - मातीतूनच फुललेले अन् बहरलेले मानवी जीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातीचे महत्त्व अनमोल आहे. या मातीतूनच मानवी जीवन फुलले आणि बहरले आहे. मातीचे महत्त्व शिल्पकारामध्ये फार आहे. प्रतिभावंत कलावंतांनी मातीत हात घातला अन् मातीला देव बनवले. मातीच्या देवता बनवून त्यांचे पूजन करण्यास मानवजातीला प्रवृत्त केले. कोणतीही धातूची शिल्पकृती बनवण्यासाठी प्रथम मातीचा उपयोग केला. मातीला हातांनी पाहिजे तसा आकार देता येतो हे शिल्पकाराने कुशलतेने जाणले व माती हे कलाविष्काराचे सहज सोपे माध्यम बनले. 28 जून रोजी होणार्‍या आंतरराष्ट्रीय मड डे (मातीचा दिवस) निमित्त...

विविध प्रकारच्या इंडिस्ट्रीजमध्ये मशिन पार्ट , मॉडेल नमुना बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. पृथ्वीतलावरील जीवन शेतीवर अवंलबून असल्यामुळे जमिनीवरील मातीचे संवर्धन अत्यंत अवश्यक आहे. शेतकरी मातीचे मोल जाणतो. या मातीचे योग्य प्रकारे मशागत करतो. त्यामध्ये आवश्यक ते खत-पाणी घालतो व जमीन सुपीक बनवितो. मातीमध्ये आवश्यक ते बी पेरता येतील व पेरल्यानंतर तो उगवण्याची अतुरतेने वाट पाहतो.

आधुनिक जीवनशैलीमुळे तुटतेय मातीशी नाते
आधुनिक जीवनशैलीमुळे मानवाचे मातीशी नाते तुटत आहे. तो मातीपासून दूर होत चालला आहे. त्याला मातीचा स्पर्शही नकोसा वाटत आहे. प्लास्टिक कचरा मातीत मिसळून जमिनी बंजार होत चालल्या आहेत. मातीमध्ये राहणारे अनेक जीवजंतू नष्ट होत चालले आहेत. मानवाचे जीवन मातीतूनच आलेले आहे. मातीतूनच फुललेले आहे. बहरलेले आहे, व शेवटी मातीतच मिसळणार आहे. ही शुद्ध नैसर्गिक माती आपल्या सर्वांच्या नशिबात लाभो, हीच इश्वर चरणी प्रार्थना.
(लेखक कला व्यवसाय केंद्राचे प्राचार्य)

आज प्रात्याक्षिक व प्रदर्शन
‘दिव्य मराठी’ आणि सोलापूर जिल्हा कला अध्यापक संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मड डे (मातीचा दिवस) साजरा करण्यात येणार आहे. या वेळी मातीची खेळणी, फळ, फुल, कोरीव काम, उतीत शिल्प, उठाव शिल्प व मूर्तिकलाचे प्रात्याक्षिके गोपाळ डोंगे दाखवणार आहेत. तसेच या वेळी शाळेचा पहिला दिवस छायाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे. आज (शनिवारी )शिवस्मारक, गोल्डफिंच पेठ येथे दुपारी 3 वाजता हा कार्यक्र म होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रियांका भट (9665036337) व संतोष संगवे (9422370045) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे.