आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापूरच्या एका तरुणाने बनवलेल्या द गोल्ड वुमन या लघुपटाची दखल आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आतापर्यंत या चित्रपटाला 12 मानांकने व पारितोषिके मिळाली आहेत. मुद्राचित्रण कलेवर आधारित या 12 मिनिटांच्या लघुपटात (शॉर्ट फिल्म) एक लहान मुलगी आणि एका म्हातारीच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन, छायाचित्रण, कथा व संकलन अशी सर्व जबाबदारी स्वीकारणार्या त्या तरुणाचे नाव आहे संदीप डोंगर.
संदीपचे शालेय शिक्षण सोलापुरातच झाले. त्यानंतर पुण्यातून चित्रकलेची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. माहिती व प्रसारण मंत्रालय व फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित फिल्म अँप्रिसिएशन या कार्यशाळेत भारतातील 60 जणांत त्याची निवड करण्यात आली होती.
लघुपट चित्रपटापेक्षा अवघड माध्यम
लघुपट हे चित्रपटापेक्षा थोडे अवघड माध्यम मानण्यात येते. याठिकाणी कमी कालावधीत आपला विषय प्रभावीपणे मांडावा लागतो. त्यामुळे लघुपट बनवताना कौशल्य पणाला लागते, असे संदीप डोंगरे मानतात. 2008 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. नाच तुझे लगीन हाय (2011) आणि मसाला (2011) चित्रपटांत असिस्टंट आर्ट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
द गोल्ड वुमनला मिळालेले नामांकन व पुरस्कार
- लडाख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ग्रीन कारपेट पी्रमिअर विभागात निवड
- 18 वा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव हैदराबाद- चिल्ड्रन्स वल्र्ड विभागात निवड
- सिम एज्युकेशन सोसायटी महोत्सव- उत्कृष्ट लघुपट प्रथम पारितोषिक
- टाटा इन्स्टिट्यूटचा कट इन महोत्सव- स्पेशन ज्युरी मेन्शन पुरस्कार
- तिसरा पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल- लघुपट विभागात निवड
- इंटरनॅशनल कल्चरल महोत्सव, पुणे- प्रथम पारितोषिक
- इनामदार कॉलेज राष्ट्रीय महोत्सव, पुणे- उत्कृष्ट लघुपट
- नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, हैदराबाद- प्रथम पारितोषिक
- राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव, अहमदनगर- उत्कृष्ट लघुपट
- आरोही फेस्टिव्हल नागपूर- उत्कृष्ट लघुपट-तृतीय पारितोषिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.