आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी'च्या संकल्पनेचे "सोने'करू,मंदिराचं रूपडं पालटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे आपल्या सिद्धेश्वराचे मंदिर सुवर्ण व्हावे ही संकल्पना मांडून "दिव्य मराठी'ने एक चांगला दृष्टिकोन समोर ठेवलाय. सर्व गोष्टी एकाचवेळी करणे शक्य नसले तरी लहान-लहान गोष्टी हाती घेऊन हा मोठा प्रकल्प आपण पूर्ण करू शकतो.
अवघ्या १० ते २० वर्षात त्याला मूर्त रूप देण्यात येईल, असा विश्वास श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला. दिव्य मराठी'ने गुरुवारी "सुवर्ण सिद्धेश्वर' ही संकल्पना मांडली होती. त्यासंदर्भात बोलताना काडादी म्हणाले की, आमचे प्रयत्न सुरूच होते. त्याला एक दिशा देण्याचे काम "दिव्य मराठी'ने केले आहे.

यात्रेनंतरबैठक घेऊ :काडादी म्हणाले, ‘यात्रेनंतर त्वरित पंचमंडळी, शहरातील जाणकार, समाजसेवी संस्था यांच्यासोबत बैठक घेऊ. यात केलेल्या सूचनांचे स्वागत करू. मंदिराचे देखणेपण वाढविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. भािवक मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास तयार आहेत. गाभारा चांदीचा करणे, ओवऱ्यावर नवे प्रोजेक्ट करणे, शिखर सोन्याचे करणे हा मानस आहे. परंतु यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.’
"दिव्य मराठी'ने गुरूवारी मांडलेल्या "सुवर्ण सिद्धेश्वर' या संकल्पनेचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून अभूतपूर्व स्वागत झाले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनेही तिला मूर्त रूप देण्याचे अभिवचन िदले. सध्या मंिदराच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त : माझेपणजोबा कै. बंडप्पा राघप्पा काडादी यांनी १८८५ साली पंच कमिटीची स्थापना केली. मंिदराचा जीर्णोद्धार मंदिरातील सोयी पुरविण्याची कामे केली. ना नफा ना तोटा तत्वावर कॅन्सर हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, धर्मादाय दवाखाना, वृद्धाश्रम अशा संस्था आजही सुरू आहेत. मंदिराच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. भक्तांच्या भावना लक्षात घेऊन मोठ्या स्वरुपाच्या सुधारणा करण्यास देवस्थान कटिबद्ध आहे.

धन्यवाद द्यावे तेवढे कमीच : "दिव्यमराठी'च्या संकल्प रचनेतील मांडणी मुद्देसूद होती. त्यामुळे "दिव्य मराठी'ला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आपण देशातील चांगल्या मंदिरासोबत आपल्या मंिदराची तुलना केली, हे खूप चांगले झाले आहे.
मास्टरप्लॅन तयार करून जिल्हाधिका-यांना देऊ-
पर्यटनवाढावे, गावाचा विकास व्हावा, उत्पन्नात वाढ व्हावी असे सगळ्यांना वाटते. त्यासाठी देवस्थान कमिटी एक मास्टरप्लॅन करणार आहे. त्यातून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून तो मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असणाऱ्या जिल्हाधिका-यांना देण्यात येईल. पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी मदत होते, पण ती तुटपुंजी असते. पाचदहा कोटीऐवजी १००-२०० कोटी रुपये लागतील. यामुळे अनेक प्रोजेक्ट राबविता येतील. तलावाच्या बाजूच्या कन्या प्रशाला इंग्रजी शाळेच्या जागेचे रुपांतर धर्मशाळेत करण्याचा मानस आहे. जूनपासून निवासाची सोय वाढवणार आहोत.