आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Capacity Was Increased By 15 Percent In Solapur

जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत १५ टक्क्यांनी झाली वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची ओळख बदलत आहे. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने, डाळिंब द्राक्षे निर्यातीत आघाडीवर आहे. यासह जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत १५ टक्के वाढ झाली. ती आता ३९.२२ टक्क्यांवर पोचली आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तयार केलेल्या जल आराखड्यावरून हजार ६०३ सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याद्वारे लाख ८४ हजार १९१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उजनी धरण कॅनालचे जाळे असूनही जिल्ह्यात दुष्काळ कायम होता. एकीकडे १२१ टीएमसीचे धरण १५९ टीएमसी साठा असलेले हजार ६०३ मध्यम आणि लघु प्रकल्प असताना जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र २४ टक्केच असा प्रश्न होता. यावर मुंढे यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे, सुक्ष्मसिंचन, कृषी विभाग सिंचन विभागास जलआराखडा तयार करण्याचे अादेश दिले होते. प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी म्हणजेच १४ लाख ८९ हजार ५०० हेक्टरपैकी लाख ८४ हजार १९१ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होण्याची क्षमता आहे. यात विहिरी शेततळ्यांचा समावेश नाही.
दुष्काळाचा डाग पुसण्यास मदत
- उजनी धरण वगळून हजार ६०३ मध्यम लघु प्रकल्प आहेत. याची सिंचन क्षमता १५९ टीएमसी असून लाख ८४ हजार १९१ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे. क्षमता २४ वरून ४० टक्केवर पोहचली आहे.”
तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी
तालुका प्रकल्प पाणीसाठा सिंचन टक्केवारी
अक्कलकोट ६६११ ०६.९ ४०५५२ २१.९९
बार्शी ७३१ १७१.३ ३८८११ २५.५०
करमाळा ७०३ ९८.२ ७७०७७ ४८.३२
माढा ५८९ ३३८.१ ४४१७७ २८.९५
माळशिरस ७७६ १२९.४ ६५१६८ ४०.५४
मंगळवेढा ५६६ ८५.७४ ५१३६२ ४५.०१
मोहोळ ६५६ १५९.१ ७६८७५ ५८.४२
उत्तरसोलापूर २२१ ८३.९८ २९७९९ ४३.६३
दक्षिण सोलापूर ३२४ ५४.१८ ३७१९० ४८.१७
पंढरपूर २७७ ८८.२ ५५ १४५ ४२.६२
सांगोला १०९९ १५४ ६८०१८ ४२.६७
एकूण ६६०३ ४५१२ ५८४१९१ ३९.२२
(पाणीसाठा दलघमी तर क्षेत्र हेक्टरमध्ये)