आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is It Possible Ramdas Athawale Card Playing Crucial Role?

सोलापुरात महायुती रामदास आठवलेचे कार्ड चालवणार?; राजकीय चर्चेला उधाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एकीकडे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी ‘पुन्हा नाही’ असे म्हणत असतानाच भाजपचे शरद बनसोडे यांनीही माघार घेतल्याने भारतीय जनता पक्षासमोरही उमेदवारीचा पेच उभा राहिला आहे. माढय़ातून सुभाष देशमुख यांनाच संधी मिळेल असे आजचे चित्र आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून बनसोडेंनी माघार घेतली असली तरी तो निर्णय त्यांनी भारतीय जनता पक्षाला अधिकृतपणे कळवला नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे ‘महायुती’कडून रिपाइंचे रामदास आठवले कार्ड चालवणार का? अशी चर्चा जोर धरत आहे.

येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांबाबतच्या चर्चा झडत आहेत. राजकीय पटलावर आजतरी सर्वचजण सावध भूमिका घेत असल्याचे दिसते. र्शी. बनसोडे आणि शिंदे अशी पुन्हा एकदा लढत होईल असे अपेक्षित धरले जात होते, पण अचानक बनसोडे यांनी वृत्तपत्रांना पत्रं पाठवून आपण माघार घेत असल्याचे कळवले. त्यासाठी त्यांनी कौटुंबिक कारण दिले आहे. त्यांच्या माघारी मागे नेमके कोणते राजकारण आहे, हे समोर आलेले नसले तरी सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाला बनसोडे यांनी काहीच कळवलेले नाही किंवा प्रदेश भाजपकडेही त्यांनी तसे पत्र दिल्याचे कोणाला माहिती नाही. त्यामुळे बनसोडे यांनी हा निर्णय नेमका कसा घेतला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सध्या भाजप पक्षांतर्गत वेगळाच पेच उभा आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. शरद बनसोडे नसतील तर कोण? या प्रश्‍ननाचे उत्तर अजूनतरी भाजपकडे नाही, मात्र रिपाइंबरोबर असलेल्या ‘महायुती’मुळे रामदास आठवले यांचे ‘एटीएम’ कार्ड सोलापुरात चालवले जाणार का? अशी चर्चा जोर धरत आहे. रिपाइंने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजप-सेनेबरोबर अजून जागावाटपाबाबत बोलणेही झालेले नाही. त्यामुळे रिपाइंला सोलापूरची जागा मिळणार का? हाच मुळात प्रश्‍न आहे. काँग्रेसकडून शिंदे हेच उमेदवार राहणार असे रिपाइंनेही गृहित धरून तेवढय़ा ताकदीने आम्हालाही उतरावे लागेल असे रिपाइंकडून सांगितले जात आहे. तर माढा मतदार संघातून सुभाष देशमुख हेच उमेद्वार असतील असे गृहित धरले जात आहे. गेल्या महिन्यात पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी माढय़ातून देशमुख असतील असे संकेत दिले आहेतच. पण तरीही शरद पवार असतील किंवा नसतील याची भाजप वाट पाहात आहे. ते जर नसतील तर देशमुखांना संधी आहे, असे भाजपला वाटते.


आम्हाला काहीच माहिती नाही- शरद बनसोडे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी माघार घेतली आहे, अशी कोणतीही माहिती आपल्याकडे आलेली नाही. मला त्याबाबत काहीच माहिती नाही. शहर भाजपकडूनही तसे काही कळवण्यात आलेले नाही.’’ देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजप


शरद बनसोडे यांनी माघार घेतल्याचा निर्णय मला वृत्तपत्रातील बातम्यांमधूनच कळाला. अजूनही आम्हाला तसे त्यांचे कोणतेही पत्र आलेले नाही. प्रदेश भाजपला त्यांनी कळवलेले आहे किंवा नाही हेही माहिती नाही. प्रदेश भाजपनेही आम्हाला काही कळविलेले नाही.’’- विजय देशमुख, शहराध्यक्ष, भाजप


‘महायुती’कडून कोणत्या जागा कोणाला याबाबतच अजून बोलणी झालेली नाही. सोलापुरात शिंदे उभे राहणार असतील तर तेवढय़ा ताकदीचाच उमेदवार द्यावा लागेल. त्यामुळे रिपाइंने सोलापुरातून निवडणूक लढवावी किंवा नाही हे आम्ही ठरविलेले नाही.’’ राजा सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष, रिपाइं