आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा अभूतपूर्व उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे’चा अखंड जयघोष, अखंड मंत्रोच्चार, रसिकशेखर दास व सहकार्‍यांचे भजन अशा उत्साही व धार्मिक वातावरणात अक्कलकोट रोडवरील इस्कॉन मंदिरात बुधवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पार पडला. शहर व परिसरातील हजारो भविकांनी दर्शन घेतले. सायंकाळी 7 वाजता गौरआरती व फ्रान्सच्या पूज्य प्रशांता माताजी यांच्या हस्ते महाभिषेक झाला. 27 नर्तिकांनी वृदांवन व गोकुळातील विविध लीला सादर केल्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शिवशरण पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, निर्मला ठोकळ यांच्यासह चादर कारखानदार यांनीही दर्शन घेतले.