आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीदान समारंभ सभागृहाच्या दीड कोटीवरून वादाला तोंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरविद्यापीठाने मांडलेल्या ९५ कोटी ९४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात दीक्षांत समारंभासाठी १.६० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देता वर्षाकाठी एकदा लागणा-या सभागृहासाठी एवढा मोठा निधी खर्च करण्याची तरतूद अनावश्यक असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

दीक्षांत समारंभाला कायमस्वरूपी मंडप उभारण्यासाठी कोटी ६० लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे. वर्षातून एकावेळ हा समारंभ होतो. यासाठी साधारणत: दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च दरवर्षी होतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या भांडवली गुंतवणुकीतून कोणते विद्यार्थीहित साधले जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु दीक्षांत सभागृहाला पावणे दोन कोटीचा खर्च करणे म्हणजे, पांढरा हत्ती पोसणे. शिवाय सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीवर नाहक खर्च होईल, याकडेही काही जाणकार लक्ष वेधत आहेत.

प्राधान्यक्रमाला तिलांजली देण्याचा हा प्रकार
दीक्षांतसमारंभ वर्षातून एकदाच होतो. यासाठी उभारणीच्या काळात विद्यापीठाने पावणे दोन कोटी रुपये केवळ दीक्षांत समारंभासाठी खर्च करणे म्हणजे प्राधान्यक्रमाला तिलांजली देणे होते. खर्च झाला तर तो व्यर्थच होईल.” डॉ.राजशेखर येळीकर, माजी वित्त लेखाधिकारी, सोलापूर विद्यापीठ

आक्षेप अयोग्य, चर्चेनंतरच मंजुरी
अंदाजपत्रकाससिनेटने दुरुस्तीसह मंजुरी दिलेली आहे. तरतुदींवर सभागृहात चर्चा झाली आहे. त्यामुळे पुन्हा आक्षेप अयोग्य आहे.” शिवशरणमाळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

विद्यार्थी मूलभूत सुविधेपासून वंचित
विद्यापीठसंकुलात स्वच्छतागृहांपासून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा कार्यान्वित नाही. ‘कॅम्पस वाय फाय’ नाही. विद्यापीठातील काही अधिकारी कर्मच-यांचे वेतन विद्यापीठ फंडातूनच होत आहे. शासनाकडून वेतन अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कॅम्पस डेव्हलपमेंटसाठी ५० लाख रूपये तरतूद तर विद्यार्थी सुविधांसाठी ३१ लाखाची तरतूद केलेली आहे. प्रत्यक्षात सुविधा मिळत नाहीत, हे वास्तव आहे.