आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगदीश पाटलांचा जातीचा दाखला बनावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जगदीश पाटील यांचा जातीचा बनावट असून तो रद्द करावा आणि प्रमाणपत्र देणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा, अशा शिफारशी दक्षता समितीचे पोलिस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अहवालात केल्या आहेत.

श्री. पाटील लिंगायत आहेत. त्यांच्याकडील तेली (इतर मागास वर्ग) जातीचा दाखला आणि वैद्यता प्रमाणपत्र तीन बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारची फसवणूक व दिशाभूल करून मिळवले आहे. जात पडताळणी कार्यालयातून पाटील यांच्या प्रकरणाची कागदपत्रे हरवली आहेत. ही बाब गंभीर असून दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्याचे सुचवले आहे. श्री. लोंढे यांनी 28 फेब्रुवारी 2012 रोजी अहवाल सादर केला. नन्हेगाव आणि बादोला येथे जाऊन पथकाने चौकशी केली. श्री. पाटील यांनी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपकडून निवडणूक इतर मागास प्रवर्गातून लढवली आणि विजयी झाले. पराभूत उमेदवार अनिल गवळी (काँग्रेस) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने अँडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्राचे डी. जे. खंबाटा आणि शासनाचे अधिकारी के. टी. कदम यांनी पाटील यांच्या जातीच्या दाखल्याची आणि वैद्यता प्रमाणपत्राची चौकशी श्री. लोंढे यांच्याकडे दिली होती.

मी काही बोलणार नाही
सदर विषय न्यायालयात असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे मत नगरसेवक जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.