आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जहाँगीर यांनी केले सेवाभावनेतून हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवासातमृत्यू, महामार्गावर अपघात, रेल्वे रुळावर अपघात, खून, टाकून दिलेले अर्भक अशा प्रकरणातील मृतदेहाची ओळख नेहमी पटतेच असे नाही. पटली तर नातेवाइकांकडून भावपूर्ण अंत्यसंस्कार होतात. अनेकवेळा बेवारस अशा स्वरूपात मृतदेह आढळतात. त्यांच्या वाट्याला भावपूर्ण अंत्यसंस्कार येणे दुरापास्त असते. किमान आदरपूर्वक तरी अंत्यसंस्कार होणे मोठी गोष्टी ठरते. शेवटचा सन्मानजनक निरोप देण्याचे काम जहाँगीर शेख गेली सात वर्षे करत आहेत. अर्थात सामाजिक बांधिलकीची भावना त्यामागे आहे. ही सेवा ते नि:शुल्क बजावतात. आतापर्यंत त्यांनी हजारपेक्षा जास्त अंत्यसंस्कार केले आहेत.

या कामाला संस्थेचे स्वरूप देण्यात आले. अकराजणांनी एकत्र येत बैतुलमाल सिफा कमिटी स्थापण्यात आली. कमिटीचे सदस्य मदत करतात. मात्र, शेख हेच प्रामुख्याने काम पाहतात. मृतदेहाची ओळख पटल्यास गावापर्यंत मृतदेह शववाहिकेतून पोहोचविण्याचे काम संस्थेतर्फे होते. आतापर्यंत तीनशे महिला, सहाशे पुरुष, चाळीसहून अधिक लहान मुले-मुली, अर्भक यांचे अंत्यसंस्कार केले आहेत. विशेष म्हणजे ८५ मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आणि मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करणे शक्य झाले.

पोलिस ठाणे, सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे विभाग येथून फोन आला की जहाँगीर तेथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतात. पोलिसांकडून पंचनामा अन्य बाबींचा सोपस्कार झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणतात. तीन दिवसांत नातेवाइकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न होतो. ओळख पटल्यास चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात येतो.

ओळख पटवण्यासाठी बेवसाइट करू
मृतदेहाचीओळख पटवणे खूप अवघड आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे बेवसाइट सुरू करण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून मृतदेहाचे फोटो टाकून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही दिवसात हे काम पूर्ण करू. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनुदान देण्यास महापालिकेस दोन महिन्यांपूर्वी निवेदन दिले आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. अनुदान मिळाल्यास चांगली मदत होईल.” जहाँगीरशेख, अध्यक्ष, बैतुलमाल सिफा
कमिटी काही अनुभव
मुंबईहूनओरिसाकडे जाताना सोलापूर स्थानकावर रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे काही ओळख नव्हती. मोबाइल नंबर लिहिलेला कागद होता. त्यावरून जहाँगीर यांनी संपर्क साधून नातेवाइकांचा शोध घेतला. नातेवाइक सोलापुरात आल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी पैसे नव्हते. इथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरा अनुभव म्हणजे दोघे वृद्ध जोडपे मुंबईहून तिरुपतीकडे जाताना महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मृतदेह परत नेणे कठीण होते. त्यामुळे वृद्ध व्यक्तीच्या विनंतीवरून येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

यांचे मिळते सहकार्य
हाजीगुलाबसाब शेख, जैनोद्दिन नदाफ, तन्वीर शेख, दौला कुमठे, बाबूलाल फणीबंद, जावीर सय्यद, सैफन शेख, सलीम तुळजापुरे, शकील शेख, आरिफ चौधरी यांचे सहकार्य असते. सर्व कमिटी सदस्य आहेत.