आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालनाचे सीईओ कोल्हे- १२ वीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास पदवीपर्यंत मिळेल यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रीयन मुलांची संख्या फारच कमी आहे. ती वाढवणे अतिशय गरजेचे आहे. बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करा म्हणजे पदवी मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हायला हवे. विद्यार्थी जीवनात टाइम मॅनेजमेंट आवश्यक आहे, असे मत जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यंानी व्यक्त केले.
"दिव्य मराठी' टेकरेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी रंगभवन सभागृहामध्ये "स्पर्धा परीक्षांची तयारी यशाची गुरुकिल्ली' या विषयावर मोफत कार्यशाळा घेण्यात आली.
डॉ. कोल्हे म्हणाले, एमपीएससीचा अभ्यासक्रम मोठा असला तरी अवघड नाही. विद्यार्थ्यांनी आधी अभ्यासक्रम समजून घ्यावे. त्यामुळे अभ्यास अवघड जाणार नाही. अभ्यासात करण्यात सातत्य आणि चिकाटी हवी. परंतु आज मुलांना अभ्यास करा किंवा कॉपी करू नका, असे सांगायची वेळ पालकांवर येते, हे चिंताजनक आहे. यावर विचार व्हावा.

यावेळी नाशिकचे साहाय्यक विक्रीकर आयुक्त माहूल इंदाणी, टेकरेल अकॅडमी, पुणेचे संचालक महेश थोरवे यांनीही मार्गदर्शन केले. धनंजय झोंबाडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण कदम, संजय बोराटे, प्रा. शरद जाधव, अनंता कदम, गजानान जोगी, अविनाश कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षेविषयी जिज्ञासा असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आयुष्यात कधीही हार मानू नका - आयुक्त विजयकुमार काळम-पाटील
कष्ट उपसा आणि आत्मविश्वासाने जीवनाचे ध्येय गाठा, असा यशमंत्र महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला. प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कोणतीही गोष्ट अवघड नाही, कष्ट आणि जिद्द हवी. विद्यार्थ्यांनी नेहमी सागराच्या लाटांशी संघर्ष करायची तयारी ठेवायला हवी. माणसाने फक्त मृत्यूलाच घाबरायला हवे, कारण ते आपल्या हातात नाही. आयुष्याच्या लढाईत कधीही माघार घ्यायची नाही. कुठल्याही परिस्थितीत आत्मविश्वास खचता कामा नये. ज्ञानाला आत्मविश्वासाची जोड द्या. स्पर्धा परीक्षा किंवा कुठलीही परीक्षा देताना भावनेपेक्षा डोक्यातील विचारांना वाव द्यावा, असा सल्ला श्री. काळम-पाटील यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...