आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalaparni And Bad Smell Issue At Solapur, Divya Marathi

जलपर्णी, दुर्गंधीने लोक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संभाजी तलावा (कंबर)च्या मागील बाजूस सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पोस्टल कॉलनी, मोहितेनगर, महिला हॉस्पिटलची मागील बाजू, विकासनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे प्रचंड जलपर्णी झालेली आहे.
जलपर्णी काढली नाही
तलावाच्या पुढील बाजूस जलपर्णी वाढली की मनपाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात काढली जाते. स्मृती उद्यान, विकासनगर, महिला हॉस्पिटलची मागील बाजू, विकासनगर परिसरात जलपर्णी कित्येक वर्षांपासून तशीच आहे. त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने ती तशीच आहे. येथील दलदलीचा लोकांना त्रास होतो.
सांडपाण्यामुळे दुर्गंधी
तलावाच्या मागील बाजूस अंत्रोळीकरनगर, विकासनगर, इंडस्ट्रियल इस्टेटमधून सांडपाणी तलावात सोडले जाते. त्या परिसरात शासकीय, न्यायालयीन कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांना त्रास होतो. डास वाढल्याने सायंकाळी घराबाहेर फिरणे मुश्किल झाले आहे.
या भागात होतो सांडपाणी, डासांचा त्रास
आयकर भवन, मोहितेनगर, महिला हॉस्पिटल मागील परिसर, पोस्टल कॉलनी, न्यायालयीन कर्मचारी वसाहत, विकासनगर आदी.
या परिसरातील घरात साचले पाणी
अंत्रोळीकरनगर, राजेशकुमार मीनानगर, औद्योगिक वसाहत, मोहितेनगर, गुरुनानकनगर, जवाननगर.