आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jankinagar Area Agitation Activist Bad Health Condition Solapur

‘त्या’ आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जानकीनगरमधील बागेसाठी आरक्षित असलेली जागा भूसंपादन करावी, या मागणीसाठी नगरसेवक नरेंद्र काळेसह त्या परिसरातील नागरिकांनी महापालिकेसमोर गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत महापालिका पदाधिकारी आणि अधिकार्‍यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी शुक्रवारीही आंदोलन सुरूच होते. नगरसेवक काळे यांच्यासह दोघांची प्रकृती बिघडली आहे.

जानकीनगरमधील बागेची आरक्षित जागा मनपाने हस्तांतर करावी, या मागणीकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. महापालिकाकडे या जागेच्या भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद नसल्याने या जागेचे भूसंपादन अनेक वर्षांपासून रखडले आहे. अंदाजपत्रकात तरतूद करता येत नसेल तर शासनाकडून अध्यादेश जारी करावा आणि नंतर आर्थिक तरतूद करावी अशी नगरसेवक काळे यांच्यासह आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. महापालिका दखल घेत नसल्याने दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, स्वास्थ्य बिघडल्याने आंदोलनकर्ते सुभाष कालदीप यांना सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. तर नगरसेवक काळे यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असताना त्यांनी अँडमिट होण्यास नकार दिला. या आंदोलनात कैलास छपरे, संतोष पाटील, सतीश भोसले, विलास बेडगे, सचिन आडके, हेमंत जैन, शंकर पडसलगी आदी सहभागी आहेत.

नैतिकता शिकवू नका - बागेसाठी राजकारण करण्याचा प्रश्न येत नाही. आमदार दिलीप माने यांनी प्रश्न सोडवला तर त्यांचा सत्कार करू. जातीचे बनावट दाखले घेणार्‍यांनी नैतिकतेचे धडे शिकवू नयेत.’’ नरेंद्र काळे, नगरसेवक