आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता बँक निवडणूक : १६ जागांसाठी ३२ उमेदवार, चाबुकस्वार बिनविरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ६५ उमेदवारी अर्ज आले होते. छाननीत ३३ अर्ज निकाली काढण्यात आले. अनुसूचित जाती आणि जमाती मतदारसंघात विद्यमान संचालक संजय चाबुकस्वार यांची निवड बिनविरोध झाली. या मतदारसंघात अर्ज भरलेल्या धर्मराज व्हटकर, श्रीकांत सायबोळू, सुभाष पाटील यांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे श्री. चाबुकस्वार यांची निवड बिनविरोध झाली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ मेपर्यंत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. उमेश मराठे यांनी वैध उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी प्रसिद्ध केली. त्यात शहरी मतदारसंघात (२५ किलोमीटरच्या आत) विद्यमान अध्यक्ष जगदीश तुळजापूरकर, ज्येष्ठ संचालक किशोर देशपांडे, तज्ज्ञ सीए संचालक गिरीश बोरगावकर, संचालक महेशकुमार अंदेली, प्रा. गजानन धरणे, भूपती सामलेटी, डॉ. पी. के. जोशी, चिदानंद बासुतकर यांच्यासह विश्वनाथ निरंजन, संजय साळुंखे, बजरंग कुलकर्णी, प्रमोद भुतडा, रवींद्र नक्का, विजय महागावकर, सोमनाथ भोगडे, प्रदीपसिंह राजपूत, अशोक सरवदे, श्रीकांत महागावकर, शिवशंकर घुगे, दत्तात्रय कल्पवृक्ष, सुहास श्रीगोंदेकर, शरद पलंगे, विजय जवळगेकर, प्रकाश मोदी, बाबूराव म्हेत्रे, नागेश ढवळे, वरदराज बंग, बाबूराव लड्डे यांची नावे आहेत.

शहरी मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे : कोंडप्पा कोरे (कसबे तडवळे, उस्मानाबाद), मुकुंद देवधर (पंढरपूर), सदाशिव दाते (लातूर), महादेव साळुंखे (बार्शी, जिल्हा सोलापूर), नितीन कोटेचा (आैरंगाबाद), सतीशकुमार सोमाणी (तेर, जिल्हा उस्मानाबाद), मुकुंद कुलकर्णी (बार्शी, जिल्हा सोलापूर), विनायक गुडे, अमित गुडे (दोघेही बार्शी).

व्हटकरांचा अर्ज झाला बाद

बँकेचे माजी संचालक मधुसूदन व्हटकर यांचे चिरंजीव धर्मराज व्हटकर यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. परंतु छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्यासह इतर दोघांचे अर्ज बाद झाल्याने या मतदारसंघातून श्री. चाबुकस्वार अविरोध निवडून आले. भोगडे, कल्पवृक्ष, श्रीगोंदेकर

सत्ताधारी‘परिवार पॅनेल’ला आव्हान देणाऱ्या ‘भुतडा-तडवळकर पॅनेल’चे उमेदवार सोमनाथ भोगडे यंदा पुन्हा मैदानात उतरले आहेत. बँकेचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय कल्पवृक्ष, मनोरमा आणि ब्रह्मदेवदादा माने बँकेचे मार्गदर्शक सीए सुहास श्रीगोंदेकर ही मंडळीही निवडणुकीत आहेत.
डॉ. सुहासिनी शहा यांचा उमेदवारी अर्ज
महिला मतदारसंघात प्रिसिजन कॅमशाफ्टसच्या डॉ. सुहासिनी शहा, डॉ. किरण पाठक, स्मिता भावे, पद्मजा काळे अशा नव्या चेहऱ्यांनी उमेदवारी भरली अाहे. विद्यमान संचालिका तेजा कुलकर्णी यांचा यंदा अर्ज नाही. परंतु अपर्णा फडके मात्र पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

संघाने दिली जबाबदारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यासारख्या सामान्याला एवढ्या मोठ्या बँकेचे संचालकपद दिले. गेल्या पाच वर्षांत संघाला अपेक्षित अशी कामे केली. त्याचीच पावती पुन्हा एकदा मिळाली. बँक आता मल्टिस्टेट झाली अाहे. इतर राज्यांमध्ये त्याचा विस्तार करण्याच्या कामात आता झोकून देऊ. संजय चाबुकस्वार, नवेसंचालक