आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर जाफरीन शेखचा मुख्य फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आंध्रप्रदेशची मूकबधिर खेळाडू जाफरीन शेख हिने येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत प्रवेश मिळविला. रविवारी झालेल्या पात्रता फेरीतून तिने ही बाजी मारली.
जाफरीनची कहाणीच वेगळी. वडील जाकीर अहमद रणजीपटू. ते सरावाला जाताना तिला घेऊन जायचे. मात्र तिचे पाय वळले लॉन टेनिस कोर्टकडे. वय होते अवघे वर्षे. टेनिस खेळण्याची ही जिद्दच तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती देऊन गेली.