आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारेगमप शोमध्ये सोलापूरचा जयंत पानसरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-सोलापूरच्या संगीत क्षेत्रात दमदार पावले टाकणार्‍या जयंत पानसरे याने आपल्या उत्तम गायकीच्या बळावर ‘सारेगमप’ या संगीत रिअँलिटी शोमध्ये उत्तम स्थान प्राप्त केले आहे. औरंगाबादच्या केंद्रातून निवड झालेल्या जयंतने सादर केलेल्या सर्व गीतांचे कौतुक झाले. तो स्पध्रेत उत्तम सादरीक रण करत आहे. तालासुरांचे बेताजबादशाह असणार्‍या तौफिक कु रेशी आणि अवधुत गुप्ते यांच्या परीक्षणातून निवडलेला जयंत हा सध्या राज्यातील सर्व स्पर्धकांच्या स्पध्रेत आपल्या सोलापूरचे प्रतिनिधित्त्व करत आहे. तो इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी असून त्यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण संगीत शिक्षिका नंदा जोशी यांच्याकडे होत आहे. त्याने सुगम संगीताचे धडे संदीप कुलकर्णी यांच्याकडे घेतले आहेत.