आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त नि तपासासाठी स्वतंत्र दोन यंत्रणा हव्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जयंती,उत्सव, मिरवणुका, नेत्यांचे दौरे आदी बंदोबस्तासाठी आणि गुन्ह्याच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पोलिस यंत्रणेची गरज आहे. पोलिसांचा बराच वेळ बंदोबस्तात जातो. त्यामुळे गुन्ह्याचे तपास करण्यास वेळच मिळत नाही, अशी सूचना नागरिकांनी केली आहे.

सोलापूर जयंती उत्सव शहर म्हणून नावारूपाला येत आहे. वर्षभरात सुमारे २९० उत्सव, जयंती साजरे होतात. पुन्हा काही अप्रिय घटना घडल्यास दगडफेक, हाणामारी घटना आल्याच. त्याचा ताण वेगळाच.

पोलिसांना स्वतंत्रपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करू द्यावे. राजकीय हस्तक्षेप थांबवावा. पोलिसांनीही अवैध धंद्यांवर कारवाई करावी. कायद्याचा धाक काय असतो, त्याची अंमलबजावणी करावी तरच पोलिसांवरील ताण कमी होईल. गुन्हेगारांना चाप लागेल.

...तरच यंत्रणा सुधारेल

वीस वर्षांपूर्वी नगरवाला कमिशन गृहविभागाने नेमला होता. त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी वेगळी यंत्रणा, व्हीआयपी बंदोबस्त आणि गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकासाठी शिफारशी होत्या. तो लागू झाल्यास वेगळे चित्र पाहायला मिळेल. सोलापुरात पोलिसांचा धाक राहिला नाही. कडक शिस्तीचे अधिकारी पाहिजेत. राजकीय दबाव पोलिसांवर आहे. एकूण कायद्याप्रमाणे काम झाल्यास पोलिसिंग सुधारेल.” अॅड.धनंजय माने, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ

उत्सवात मिरवणूक नको
जयंती,सण साजरे करावेत. पण, मिरवणुकीचा मोठा खर्च टाळून स्रेहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक खरेदी, शिक्षणासाठी मदत हे उपक्रम केल्यास चांगले होईल. बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर असतो. अन्य कामात लक्ष घालून गुन्हेगारी नियंत्रित आणता येईल.” उदय नानजकर, शेतकरी